पेगासस हेरगिरी | केंद्र सरकार लोकांचे व्हाट्सअँप, इमेल, SMS, पेमेंट हिस्ट्री, मोबाईल असं सर्वच पाहातंय

मुंबई, ३१ जुलै | संसदेत शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले होते. लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात. पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’
दरम्यान, राज्यसभेतही शुक्रवारी हेरगिरी कांडासह कृषी कायदा आणि महागाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दुपारनंतर कृषिमंत्र्यांनी एक विधेयक सादर केले. ते गोंधळातच आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्यानंतर राज्यसभा सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून लोकांना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर ट्वीटमधून निशाणा साधतानाच सामान्य जनतेला देखील इशारा दिला आहे. “सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
The government is reading your :
SMS
Seeing your videos and pictures
Medical records
Your payment history
Contacts #PegasusSnoopgate is not just about politicians, journalists and activists, it’s about you.Think.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 31, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Minister Jitendra Awhad warns people on Pegasus Spyware Issue news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं