राम मंदिर ट्रस्ट'वरून भाजपमध्ये जातीय राजकारण तापलं

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले होते आणि त्याचे नेतृत्व सुद्धा ओबीसीने केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. मात्र ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टवरून राजकारण तापलं असून त्याला जातीय रंग देण्यास सुरुवात केली आहे.
कल्याणसिंह, विनय कटियार आणि आपल्यासह रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी नेत्यांनी केले आहे. परंतु, सरकारने राजकीय व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी राजकारणाबाहेरील एखाद्या ओबीसी व्यक्तीला ट्रस्टमध्ये स्थान द्यायला हवे होते, अशी इच्छा मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी व्यक्त केली.
ट्रस्टच्या डीडमध्ये ९ कायमस्वरुपी सदस्यांची नावंही देण्यात आली होती. शिवाय या समितीत दलित समाजातील एका व्यक्तिला घेतानाच ब्राह्मण समाजातील ८ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रस्टच्या या स्वरुपामुळे राम मंदिर आंदोलनातील पहिल्या फळीतील भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या फळीतील हे नेते ओबीसी असल्याने ओबीसी समाजाला ट्रस्टमधून डावलल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.
Web Title: Mistakes exclude OBC in Ram Mandir Trust who lead Ram Temple agitation former Minister Uma Bharti.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं