मोदींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून महागाई, बेरोजगारी व दुष्काळ गायब

नवी दिल्ली : लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
त्यात मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलचे भाव, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर वाढलेला दुष्काळ हे प्रमुख मुद्दे भाषणातून पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहेत. सध्या फसलेल्या विकासाची केवळ जाहिरातबाजी करून आणि थ्रीडी दाखवून लोकांना मागील २ महिन्यांपासून मूर्ख बनवण्याचं काम भाजप आणि शिवसेना करत आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं