मोदींचे कुटुंब असते तर तेही सहलीला गेले असते: आनंद शर्मा

नवी दिल्ली : राजीव गांधी यांनी जे केले तेच कोणत्याही पंतप्रधानाने केले असते. पण सध्याच्या पंतप्रधानांना कुटुंबच नाही. ते असते तर तर मोदीही तिथे गेले असते. आता ते एकटेच जातात कारण त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही आणि त्यांना कुटुंबाबद्दल आदरही नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कथित कौटुंबिक सहलीवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजीव गांधी यांच्या ‘त्या’ सहलीसाठी आयएनएस विराट या युद्धनौकेचा गैरवापर करण्यात आला होता, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाना तोंड फुटले होते.
त्या सहलीसाठी INS विराटचा गैरवापर झाला नव्हता असा दावा माजी नौदलप्रमुखानी केला होता तर असा गैरवापर झाला होता असा दावा आणखी एका माजी नौदल अधिकाऱ्याने केला होता. या सहलीत राजीव गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांचे काही नातेवाईक, आणि राजीव यांचे मित्र सहभागी होते, असा थेट आरोप आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं