गुजरातमधील बलात्कार प्रकरण, तब्बल ५० हजार यूपी बिहारींचे गुजरातबाहेर पलायन

अहमदाबाद : साबरकांठा येथे एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर बलात्कारी आरोपी हा बिहारी असल्यामुळे उत्तर भारतीयांविरोधात संपूर्ण गुजरात मध्ये आंदोलन पेटलं आहे. त्यानंतर भेदरलेल्या उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन करण्यास सुरुवात केली असून, आता पर्यंत तब्बल ५० हजारांवरून अधिक युपी-बिहारींनी गुजरातच्या बाहेर पलायन केलं आहे.
चिमुकलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर नेहमीच शांत आणि संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला असून युपी-बिहारच्या कामगारांना लवकरात लवकर गुजरात सोडून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, जवळपास ५०,००० हून अधिक उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे वृत्त आहे.
राज्यातील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच संपूर्ण गुजरातमध्ये सुरू झाली. त्यानंतर या आंदोलनाने मोठ स्वरूप धारण केले असून अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांना खूप मारहाण करण्यात आली आहे तसेच अनेकांना शोधून चोप दिला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ४२ गुन्हे दाखल केले आहेत. तर तब्बल ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील ६ जिल्ह्यांमध्ये या घटना सर्वाधिक घडत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं