भाजपच्या नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली; कमलेश यांच्या आईचा आरोप

नवी दिल्ली: हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेत्यावर कट रचण्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. राम जानकी मंदिर प्रकरणामुळे आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप कमलेश तिवारीच्या आईने केला आहे. स्थानिक नेते शिवकुमार गुप्ता यांचे नाव घेत त्या म्हणाल्या की, ते माफिया असल्याने माझ्या मुलाच त्यांच्यासमोर काहीच चालू शकलं नाही. तत्पूर्वी, कमलेश तिवारी यांच्या मुलानेही एनआयएला घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आम्हाला प्रशासनावर विश्वास अजिबात नाही.
कमलेश तिवारी यांचा मुलगा सत्यम तिवारी यांनी सांगितलं की, ‘ज्या लोकांना या हत्येप्रकरणी अटक झाली आहे त्यांनीच मारले आहे की मारणारे लोक दुसरेच कोणी आहेत. तसेच, जर ही माणसे खरी गुन्हेगार असतील आणि त्यांच्याविरूद्ध काही व्हिडिओ पुरावे असतील तर त्याची चौकशी एनआयएने करायला हवी. सत्यम तिवारी पुढे म्हणाले की, जर त्यांच्या तपासणीत हे सिद्ध झाले तरच आमचं कुटुंब समाधानी असेल, अन्यथा आम्हाला या प्रशासनावर विश्वास नाही’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
त्याचवेळी कमलेश तिवारी यांच्या आईच्या संशयावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला. एका मोर्चाच्या वेळी ते म्हणाले की समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात हिंदू पक्षाच्या नेत्याला मारण्यात आले होते, त्यांना सुरक्षा देण्यात आली होती पण योगी सरकारने सुरक्षा पुरविली नाही. त्याच्या आईने बर्याच वेळा याचा उल्लेख केला आहे हे अधोरेखित करायला हवं असं ते म्हणाले.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून स्वत:चे वर्णन करणारे कमलेश तिवारी यांची शुक्रवारी घरात हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाल्याने तिन्ही संशयितांना स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दोन जण कमलेश तिवारी यांना भेटायला आले होते. ज्यांना तिवारी यांनी आत बोलावले. त्यानंतर त्याच्या जोडीदाराला सिगारेट आणण्यास सांगितले. त्यानंतर कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली या समजतं. घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने हे लोक आत आले, पण त्यांच्या डब्यात शस्त्रे होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं