खिदी-खिदी हसून पाठिंबा देतात की बेंच वाजवून? भारती पवार यांना पाठींबा देण्यासाठी थांबलेलो: रक्षा खडसे

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ समजा माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या एकूणच स्पष्टीकरणावरून त्यांची किंवा करावी असंच म्हणावं लागेल. देशाने आजपर्यंत संसदेत एवढ्या विषयाला किंवा मुद्दयाला पाठिंबा देताना समर्थन करणारे खासदार हे हाताने बेंच वाजवून समर्थन देतात हे पाहिलं आहे. मात्र संसदेतील बेंचखाली तोंड लपवून खिदी-खिदी हसून समर्थन देण्याचा जावईशोध खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रतिक्रयेतून लागला आहे.
व्हायरल व्हिडीओविषयी स्पष्टीकरण देताना खासदार खडसे यांनी संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे अगदी सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. परंतु‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ त्याचे राजकीय भांडवल करीत आहेत. दिंडोरीच्या खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असे मत खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना ‘आमच्या हसण्याची विषयाची चर्चा करण्यात आली. आमची मिडीयाला विंनती आहे, कि चांगल्या कामाची प्रसिध्दी करावी, त्या मुंडेच्या कन्या आहेत, आणि मी खडसेंची सून आहे म्हणून त्यांनी हास्य केले असे म्हणणे म्हणण योग्य नाही. डॉ.भारती पवार या खासदार आहेत. त्याही नवीन खासदार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही रक्षा खडसे म्हणाल्या. वास्तविक खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या एकूण देहबोलीकडे लक्ष दिल्यास त्यांच्यामध्ये कोणताही संवाद होताना दिसत नाही, मात्र खासदार भारती पवार जस जसा त्यांचा एक एक मुद्दा मांडत होत्या त्यानुसार खासदार खडसे आणि खा. प्रितम मुंडे यांना हसू अनावर होताना दिसत होतं. भारती पवार यांनी स्वतःच एखादा गमतीशीर मुद्दा मांडला असता तर विषय समजण्यासारखा होता, मात्र थेट बेंचखाली तोंड घालून हसणे म्हणजे निव्वळ असुसंस्कृत पनाचं म्हणावा लागले आणि त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे केवळ वायफळ उत्तर.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं