जुमलाजीवी, दंगलजीवी, रक्तजीवी, अदानीजीवी, अंबानीजीवी, फेकुजीवी, थापाजीवी आणि...

मुंबई, ०९ फेब्रुवारी: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत काल चर्चा झाली. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही. एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं होतं.
मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो असं मोदी म्हणाले होते.
त्यानंतर मोदींवर विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी मोजक्या शब्दात ट्विट करत पंतप्रधानांचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “जुमलाजीवी.. दंगलजीवी.. रक्तजीवी.. अदानीजीवी.. अंबानीजीवी.. फेकुजीवी.. थापाजीवी.. असत्यजीवी..!! गोडसेजीवी..!!
जुमलाजीवी.. दंगलजीवी.. रक्तजीवी.. अदानीजीवी.. अंबानीजीवी.. फेकुजीवी.. थापाजीवी.. असत्यजीवी..!!
गोडसेजीवी..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 9, 2021
News English Summary: In the last few years, a new community has emerged in this country, it is the agitators, they reach there wherever there is a movement, be it lawyers, they reach wherever there is a movement of students, the country should beware of these agitators, the agitators are all parasites, Modi had said that the experience of these agitators and parasites comes.
News English Title: Mumbai Congress president Bhai Jagtap criticised Modi over his statement about farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं