चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
त्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंच परंतु त्यानंतर चंद्राबाबूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांची देखील भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली असून तब्बल दीड तास त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू लखनऊत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.
तसेच टीडीपी प्रमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सुधाकर रेड्डी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांचीही चंद्रबाबू नायडू भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या वेगवान हालचालींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं