आता बोलून टाका! उरी, पुलवामा व गडचिरोलीतील घटनेला पण नेहरू जबाबदार: नेटिझन्स

कौशंबी : उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले.
दरम्यान, येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा कुंभमेळ्यात आले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. इतर पक्ष अस्तित्वातही नव्हते. त्यावेळच्या अनागोंदी कारभारामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन हजारो लोक मारले गेले होते. मात्र सरकारची प्रतिमा जपण्यासाठी चेंगराचेंगरीच्या बातम्या दाबल्या गेल्या. ही घटना घडली त्याचे वार्ताकन करण्याची हिंमत त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनीही केली नाही, तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावेही जाहीर केली गेली नाहीत की, त्यांना एक रुपयांची भरपाई मिळाली नाही. नेहरूंच्या असंवेदनशीलतेचा हा एक दाखलाच आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मोदी प्रचारात मूळ मुद्दे सोडून प्रत्येक विषयात नेहरू आणि गांधी घराण्याला ओढत असल्याने आता नेटकरी देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीला केवळ नेहरूच जवाबदार असतात, त्यामुळे देशात घडलेल्या उरी, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामागे देखील नेहरूंचा हात असून तेच या गंभीर घटना जवाबदार असल्याची उपहासात्मक टीका सध्या समाज माध्यमांवरील नेटकरी करताना दिसत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं