सावधान! आजपासून गाडी चालवताना चूक केल्यास दंड भरताना सगळा पगारच जाईल

नवी दिल्ली : वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.
लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ ५०० रुपये होता. नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट १० हजार रुपये करण्यात आला आहे. केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते.
काही नियमभंग आणि नवी दंड आकारणी
- हेल्मेन न घातल्यास – आतापर्यंत १०० रुपये दंड होता, आता १,००० रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द
- विना परवाना वाहन चालवल्यास – आधी ५०० रु., आता ५ हजार रुपये दंड.
- दुचाकी अतिरिक्त भार – आधी १०० रु., आता २ हजार रुपये दंड.
- सीट बेल्ट न लावल्यास – आधी १०० रुपये, आता १००० रुपये दंड.
- वाहन चालवताना फोनवर बोलल्यास – आधी एक हजार रु., आता ५ हजार रु. दंड
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं