कर्नाटक निकाल: ४ राज्यात भाजपने जनादेश धुडकावल्याचं विसरून मोदी-फडणवीसांचा सेनेला टोला

मुंबई: कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची री ओढत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
‘जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत,’ असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
सध्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसत आहे आणि त्यामुळे ते संतापलेले दिसत असून प्रत्येक गोष्टीत जनादेशाचा आदर भाजप करते असे डोस पाजू लागले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील भाजपच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येतं आहे.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाला जनादेश असल्याने लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, ही भारतीय जनता पक्षाची इच्छा होती. परंतु, मित्र पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर केल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा टोला हाणत भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं होतं.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भारतीय जनता पक्ष-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. असं असून देखील सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनवरून बाहेर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
भारतीय जनता पक्ष जनादेशाचा किती आदर करतं याची उजळणी केल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांच्यासमोर येण्याचं धाडस होणार नाही. अगदी देशभरातील ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे दाखले द्यायचे झाल्यास, गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भारतीय जनता पक्षाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भारतीय जनता पक्षाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भारतीय जनता पक्षाला ५३ जागा, मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ २ तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या,” तरी या राज्यांमध्ये घोडेबाजार करत भाजपने सत्तास्थापन केल्याचा इतिहास आहे. अशा अनेक राज्यांमध्ये जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असताना देखील भारतीय जनता पक्षाने राज्य काबीज केली आणि त्याला अमित शहांची चाणक्यगिरी असं संबोधलं आणि आज हाच पक्ष आणि त्यांचे नेते इतर पक्षांना नैतिकतेचे डोस पाजताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
PM Narendra Modi and Former CM Devendra Fadnavis Criticizes Chief Minister Uddhav thackeray after Karnatak ByPoll Election result
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं