देशात प्रचंड महागाई, दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा उद्या वाढदिवस | भाजपचा सोन्याच्या अंगठ्या आणि मासेवाटप कार्यक्रम

PM Narendra Modi’s Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2022 रोजी 72 वर्षांचे होतील. मे २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी प्रथमच पंतप्रधान झाले आणि त्यांच्या सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशात प्रचंड महागाई वाढली असताना, दुसरीकडे बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजप विरोधात प्रचंड रोष आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसानिमित्त तामिळनाडू भाजपनेही खास आणि आगळीवेगळी अशी योजना आणली आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना तमिळनाडू भाजपकडून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. सोबतच ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत.
उद्या जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी :
याबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले की, अंगठी वाटप योजनेसाठी आम्ही चेन्नईतील RSRM सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. याठिकाणी उद्या जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. अंगठीसाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक अंगठी २ ग्रॅमची असेल, ज्याची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत आहे. ही मोफत देण्यात येणारी वस्तू नाही. पण या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांचे स्वागत करत आहोत. १७ सप्टेंबरला रुग्णालयात १० ते १५ मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: PM Narendra Modi Birthday on 17 September 2022 check details 16 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं