पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर, आणीबाणीविषयी काय भाष्य करणार?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून ते आज आणीबाणीविषयी काय भाष्य करणार याकडेच प्रसार माध्यमांचं लक्ष आहे. नरेंद्र मोदी आज एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
आशियाई देशांसाठी आधुनिक पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यासाठी मदत करणं हे एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच मूळ उद्दिष्ट आहे. पंतप्रधान यांच्या बरोबरच भारतातील अनेक मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असून, उद्योगपतींबरोबर नरेंद्र मोदींची वेगळी बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यातील विकासकामांची मोदींना माहिती करून देतील. परंतु सर्व प्रसार माध्यमांचं विशेष लक्ष असणार आहे ते आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथन कार्यक्रमात मोदी काँग्रेसवर काय तोंडसुख घेणार यावरच.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं