विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या

लखनौ: विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
रणजीत बच्चन हे हजरतगंजच्या ओसीआर इमारतीमध्ये राहत होते. यापूर्वी ते समाजवादी पक्षामध्ये होते. ते त्यांचा भाऊ आशिष श्रीवास्तव सोबत फिरण्यासाठी निघाले होते. परिवर्तन चौकामध्ये ग्लोब पार्कमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी डोक्याला लागल्याने रणजीत यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमध्ये राहणारे रणजीत बच्चन हे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञांत व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
तत्पूर्वी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला होता. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या होत्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला होता. कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते.
Lucknow: Hindu Mahasabha leader Kamlesh Tiwari critically injured after being shot at in his office. More details awaited. pic.twitter.com/KoQifAZW8X
— ANI UP (@ANINewsUP) October 18, 2019
Web Title: President of Vishwa Hindu Mahasabha Ranjit Bachchan was shot dead near his home.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं