आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला? - प्रियांका गांधी

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर टीका होते आहे.
प्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यासोबतच प्रियंका यांनी मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्कारासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. “संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
काय आहेत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न:
- सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे
- हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये
- आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?
- आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?
- आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?
5. हम इंसानियत के नाते चिता से फूल चुनकर लाए मगर हमें कैसे माने कि यह शव हमारी बेटी का है भी या नहीं?
इन प्रश्नों के उत्तर पाना इस परिवार का हक है और उप्र सरकार को ये जवाब देना पड़ेगा। 2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 3, 2020
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे प्रस्ताव दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
News English Summary: After Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra met Hathras gang-rape victim’s relatives on Saturday, Vadra tweeted a list of questions and demands of the 19-year-old Dalit woman’s family. The party’s general secretary said the family wants a judicial probe into the matter to be conducted through the Supreme Court and that they have also sought the suspension of Hathras’ district magistrate.
News English Title: Priyanka Gandhi Asks Few Questions To CM Yogi And Modi Government On Hathras Case Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं