नाणार विरोधी कृती समितीने घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : कोकणातील विवादित रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पांना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये आणखी एका विरोधी पक्षाची भर पडण्याची शक्यता आहे.
नाणार विरोधी कृती समितीच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर आपण नाणारला शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं राहुल गाधी यांनी प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केलं. तसेच काँग्रेस नाणारवासियांच्या पाठीशी उभी असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्टं केलं. कोकणातील नाणार ग्रीन रिफायनरीला स्थानिक भूमीपुत्रांचा प्रचंड विरोध असुंन या रिफायनरी मुळे कोकणातील निसर्गाला प्रचंड धोका आहे असं त्यांचं मत आहे.
मनसे आणि शिवसेनेचा या रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. तर काही दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेवर सुद्धा स्थानिकांनी जमीन अधिग्रहण अध्यादेशावरून राग व्यक्त केला होता आणि अध्यादेश रद्द केल्याशिवाय कोकणात येऊ नका असा सज्जड इशाराच त्यांनी सेना प्रमुखांना दिला होता. त्यामुळे सेनेला तात्काळ नाणार मध्ये सभा घेऊन जमीन अधिग्रहण अध्यादेश रद्द केल्याची घोषणा करावी लागली होती. परंतु पुढच्या १५ मिनिटांतच मुख्यमंत्र्यांनी उद्योमंत्र्यांचे अधिकार सांगितले आणि शिवसेनेला तोंडघशी पाडले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं