शरद पवार आणि राज ठाकरेंची भेट, नेमकं निमित्त काय ?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सकाळीच मुंबईतील पेडर रोड येथील शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीमागचं कारण गुलदस्त्यातच असले तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळे कयास बांधण्यात येत आहेत.
शरद पवारांची त्यांची भेट घेण्यामागे नेमके कारण काय हे अजून कळू शकलेल नाही. परंतु राजकीय वर्तुळात अचानक ही घटना घडल्याने या भेटी मागचं नक्की कारण तरी काय हे जाणून घेण्यासाठी सर्वच पक्षात कमालीची उत्सुकता वाढली आहे.
मनसेने उद्या गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंची उद्या शिवतीर्थावर होणारी सभा ही सर्व विक्रम मोडीत काढेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सभेला राज ठाकरे त्यांच्या शैलीत विद्यमान सरकारवर तुफान टीका करण्याची शक्यता आहे. पण त्या सभेच्या एक दिवस आधी ही भेट घडल्याने सर्वांनाच भेटीमागच्या नेमक्या कारणांची उत्सुकता आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची महामुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीने टीआरपीचे विक्रम मोडले होते. परंतु त्या मुलाखतीतून राज ठाकरेंमधलं एक प्रगल्भ व्यक्तिमत्व महाराष्ट्राने अनुभवलं होत. राष्ट्रवादीचे ग्रामीण भागात प्राबल्य आहे तर राज ठाकरेंच्या मनसेची शहरी भागात मोठी ताकद असून काही दिवसांपासून मनसेला ग्रामीण भागातून आणि विशेष करून शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढताना दिसत आहे.
या सर्व गोष्टी विचारात घेता ह्या भेटीला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं