प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उमेदवारीच समर्थन केलं आहे. दशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलणाची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी कशी काय दिली? असा थेट प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाईम्स नाऊ वाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना मोदींनी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते अत्यंत महागात पडेल, असे धक्कादायक उत्तर मोदींनी दिलं आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदींना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी, बोलताना मोदींनी राफेल, दहशतवादी, काश्मीर घुसखोरी, मोदींपुढील आव्हाने यांबाबत मुलाखतीदरम्यान सविस्तर चर्चा केली. त्याचदरम्यान, मोदींना साध्वी ठाकूर यांना दिलेल्या उमेदवारीबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर, मोदींनी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या, शीख हत्यांचा संदर्भ देत उत्तर दिले. तसेच, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थनही केले.
विशेष म्हणजे, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, सामान्यांपासून ते विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताच साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याचीही कबुली दिली आहे आणि भाजपने देखील प्रकरण अंगलट येईल म्हणून सदर विषयावर हात वर केले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं