भाजप व संघामुळेच हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान: शंकराचार्य

नवी दिल्ली : भाजप आणि संघामुळेच हिंदू धर्माचे नुकसान होत असून सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही अशी थेट टीका करतानाच भाजपचे नेतेच भारतातील बीफचे सर्वात मोठे निर्यातदार असल्याचा गंभीर आरोप शंकराचार्य यांनी केला आहे.
‘आरएसएस’मुळे आणि सत्ताधारी भाजपमुळेच अलिकडील काही वर्षांत हिंदू धर्माचे मोठे नुकसान झाले आहे असा थेट आरोप शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दात टीका केली असून भागवतांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही हे आमच्यासाठी फार धक्कादायक आहे असं विधान त्यांनी केलं आहे.
इंडिया टुडेसोबत बोलताना शंकराचार्य म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही हे फारच धक्कादायक आहे. पुढे शंकराचार्य असं सुद्धा म्हणाले की,’हिंदू धर्मात लग्न हा एक करार आहे. पण, विवाह ही जीवनभराची साथ आहे. मोहन भागवत म्हणतात की, जो भारतात तो हिंदूच आहे. मग, अमेरिकेत हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना काय म्हणणा?’, असा खडा सवालही शंकराचार्यांनी विचारला आहे.
पुढे गोहत्यावर बोलताना शंकराचार्य म्हणाले की, ‘देशात प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे असल्याचे सुद्धा शंकराचार्य यांनी स्पष्ट केलं.
पुढे शंकराचार्य यांनी भाजप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे;
१. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय?
२. खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय?
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले?
४. आयोध्येत राम मंदिर उभारले?
या सर्व प्रश्नांची उत्तर जनतेला देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरले असून याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही शंकराचार्य पुढे म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं