राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली | सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं - संजय राऊत

मुंबई, १४ जून | अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
संजय सिंह रविवारी लखनऊ येथे म्हणाले की, ‘ट्रस्टने १८ मार्च रोजी १८.५ कोटीत सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांच्याकडून जमीन खरेदी केली. हीच जमीन ५ मिनिटांपूर्वी हरीश पाठक व कुसुम पाठकांकडून २ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती. केवळ ५ मिनिटांत ही जमीन १६.५ कोटींनी महाग झाली. भाविकांच्या दानाची ही सर्रास लूट आहे. या दोन्ही व्यवहारांत डॉ. अनिल मिश्रा साक्षीदार आहेत.’ रजिस्ट्रीचा ई-स्टॅम्प ५.११ वाजता खरेदी केला गेला.
अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
आज (१४ जून) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी फोन करुन या घोटाळ्याची माहिती दिल्याचे सांगितले. संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे. या निधीचा गैरवापर होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
News Title: Shivsena MP Sanjay Raut asked RSS Mohan Bhagwat for clarification over Ram Janmabhumi Land scam news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं