देशभरात २ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी

नवी दिल्ली: पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर देऊ लागले आहेत. आता २ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचं उत्पादन २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. त्याबाबत केंद्रानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे. याबाबत पर्यावरण मंत्रालयानंही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये, असं त्यात म्हटलं होतं.
दरम्यान, प्रत्येक कार्यालयांमध्ये कचरा वेगवेगळ्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. याव्यतिरिक्त टिव्ही, रेडिओद्वारे एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी राज्यांनी जनजागृती करावी, असंही सांगण्यात आलं आहे. तसंच पर्यावरण स्थळं, धार्मिळ स्थळं, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला Garbage Cafe तयार करण्यात आला आहे. एक किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात लोकांना मोफत जेवण मिळणार आहे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अंबिकापूर महानगर पालिकेच्या वतीने गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहावे तसेच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एक किलो प्लास्टिक गोळा करून आणले तर त्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण मिळणार आहे. तसेच ५०० ग्रॅम प्लास्टिक कचरा आणणाऱ्या लोकांना या कॅफेमध्ये नाष्टा देण्यात येणार आहे. गार्बेज कॅफेमध्ये नागरिकांना मोफत जेवण मिळणार असल्याने सर्वत्र या कॅफेचं कौतुक होत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं