स्वातंत्र्यपूर्वकाळात मुस्लिम लीग आणि RSS हे इंग्रजांचे एजंट होते: जावेद अख्तर

मुंबई: ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला गुरुवारी पाच वर्षे पूर्ण झालीत. त्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जावेद अख्तर बोलत होते. देशातल्या ३६ विद्यापीठांमध्ये सध्या खदखद सुरू आहे. भाजप ही एक शाखा असून मुख्य पक्ष आरएसएस आहे आणि स्वातंत्र्यपूर्वकाळात मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते, असा घणाघात जावेद अख्तर यांनी केला.
तर ‘वारिस पठाण तू कुणाकडे नोकरी करतोस? तुम्ही १५ कोटींच राहणार. १५ कोटीचा ठेका तुला कुणी दिला? अशा शब्दात जावेद अख्तर यांनी वारीस पठाण यांना फटकारले आहे. पाकिस्तान तयार होऊन जिना यांची इच्छा पूर्ण झाली. पण जिना यांची विचारसरणी आजही देशात आहे.
तत्पूर्वी, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.
सध्या देशभरात CAA आणि NRC आंदोलनं पेटली आहेत आणि त्यात सर्वाधिक प्रमाण हे मुस्लिम समाज आणि मुस्लिम संघटनांचं आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय हिंदू-मुस्लिम असाच झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी वारीस पठाण यांनी असं धार्मिक विधान केलं असावं असं म्हटलं जातं आहे.
Web Title: Story lyricist writer Javed Akhtar slams to AIMIN leader former MLA Waris Pathan RSS and Muslim League.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं