BREAKING | कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम निश्चित करा | सुप्रीम कोर्टाचे केंद्रला आदेश

नवी दिल्ली, ३० जून | कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी भरपाईची रक्कम निश्चित करा असे आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. यासोबतच, कोरोनामध्ये जीव गमावणाऱ्यांच्या वारसांचे काय याबाबत एक दिशा-निर्देश जारी करावेत असे निर्देश कोर्टाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ला दिले आहेत.
कोरोना काळात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देताना सुप्रीम कोर्टाने तीन ठळक मुद्दे केंद्राच्या निदर्शनास आणून दिले आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे, कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर जारी केल्या जाणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी गाइडलाइन जारी करावे. दुसरा मुद्दा म्हणजे, वित्त आयोगाला जशा स्वरुपाच्या शिफारसी पाठवण्यातत आल्या आहेत, त्या आधारे केंद्राने लवकरात लवकर अशा व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी / वारसांसाठी एक विमा योजना सुरू करावी. तिसरा मुद्दा असा की NDMA ने मदतीचे किमान निकष लक्षात घेऊन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी 6 आठवड्यांच्या आत गाइडलाइन जारी कराव्या.
दोन दिवसांत दोन मोठे आदेश:
सुप्रीम कोर्टाने गेल्या दोन दिवसांत कोरोनासंदर्भात दोन मोठे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी केंद्राला निर्देश दिले. तसेच NDMA ला गाइडलाइन तयार करण्यास सांगितले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title:
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं