२०१४ मधील आश्वासनं केवळ थापा ठरल्या, आज नवा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

नवी दिल्ली: आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपला अधिकृत जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत.
भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास ७५०० सूचना पेट्या, ३०० रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुण वर्गासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच या संकल्पपत्रात रोजगार निर्मितीबाबत पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या २ एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं