वायएस जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळात ५ जातीचे ५ उपमुख्यमंत्री

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारमध्ये केवळ १-२ नव्हे, तर तब्बल ५ उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संविधानिक अधिकार नसतो, मात्र स्वतःच्या पक्षातील इतर वजनदार नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे पद निर्माण गेलं असलं तरी त्याचा वेगळाच प्रयोग सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात केला जात आहे.
याच पदाला आता जातीचा आधार देऊन पक्षातील विविध जातीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं जाणार आहे. त्यात जातीय राजकारणाचा विचार करता एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्यांक आणि कापू अशा एकूण ५ समाजातील नेतेमंडळींना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या पुढील म्हणजे २०२४ मधील विधानसभा निवडणुकीची बीज रोवल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे संपूर्ण देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात तब्बल ५ उपमुख्यमंत्री असतील. चंद्राबाबू नायुडू यांच्या सरकारमध्ये बीसी आणि कापू अशा २ समाजातील उपमुख्यमंत्री होते. वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमधील २५ मंत्री येत्या शनिवारी शपथग्रहण करतील. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाची फेररचना सुद्धा केली जाईल. प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे. आपल्या वायएसआर काँग्रेसचं सरकार आणि आधीचं चंद्राबाबूंचं सरकार यातील फरक लोकांना दाखवून द्यायला हवं.” असेही वायएस जगनमोहन रेड्डी म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं