भीषण बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या केवळ १११७ जागांसाठी तब्बल १४ लाख ७१ हजार अर्ज

मुंबई : भारतीय रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) १११७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या जागांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास १३१७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे आहे. यात अर्ज करणारे सर्वाधिक उमेदवार हे महाराष्ट्रातून असल्याचे समजते.
देशात आजही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण आणि तरुणींमध्ये चाललेली स्पर्धा आणि देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली बेरोजगारी यांच्याकडे पाहिल्यास कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दरम्यान स्पर्धा परीक्षांकडे तरुणाईचा कल वाढला असून गावकडील मुले देखील आज स्पर्धा परीक्षांवर जोर देत आहेत. त्यातून या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि स्पर्धा वाढली आहे. त्यातच, पोलीस भरती, सैन्य भरती आणि रेल्वे भरती यासाठीही ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. नोकरीच्या अधिकृत जाहिरातीसाठी तरुण दैनिक वर्तमानपत्र आणि संबंधित वेबसाईटवर अपडेट असतात.
नुकतेच रेल्वे विभागाकडून RPF आणि RPSF संवर्गातील उपनिरीक्षक पदांच्या १११७ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीला एकूण १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष प्रवर्गासाठी एकूण ८१६ जागांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या ८१६ जागांसाठी १२.४० लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर, महिला प्रवर्गातील ३०१ रिक्त पदांसाठी एकूण २.३१ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता देशातील बेरोजगारी किती भीषण झाली आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे केवळ सरकारी नोकरी नाही तर खाजगी क्षेत्रात देखील अधिक रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मोठी मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं