राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो - नारायण राणे

मुंबई ०८ ऑगस्ट | राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे म्हणाले.
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या येत आहेत. त्यावरूनही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. त्यामुळे ‘सामना’कडे छापण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते भाजपबद्दलच्या बातम्या देत असतात. संजय राऊतांना तशी वाईट सवयच आहे. लोकांना सांगण्यासाठी सामनाकडे काहीच नाही, असं सांगतानाच पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही. यात कुठलं राजकारण नाही. बदला बदली नाही किंवा मोर्चेबांधणीही नाही, असं राणेंनी स्पष्ट केलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Union minister Narayan Rane criticized congress leader Rahul Gandhi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं