VIDEO: हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावली, मग उपस्थितांनी हल्लेखोराला चोप दिला

अहमदाबाद : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या भर प्रचार सभेतील मंचावर श्रीमुखात लगावण्यात आली आहे. गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान, एका अज्ञान व्यक्तीने हार्दिक यांच्या कानाशिलात लगावली. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचं आवाहन ते मतदारांना करत आहेत. त्यासाठीच, आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप, त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं