शिवसेना अजून यूपीए'चा भाग नाही, आमची स्वतंत्र वाटचाल सुरू - संजय राऊत

नवी दिल्ली, ०३ ऑगस्ट | दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी विरोधकांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी देखील सुरु आहेत. त्यालाच अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा युपीए संदर्भातील चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेली शिवसेना दिल्लीत मात्र अधिकृतपणे या पक्षांसोबत नाही. काल राऊत यांनी राहुल यांची भेट घेतल्यानं त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना आता अधिकृतपणे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) भाग झाली आहे का, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही देशहिताच्या विषयांवर विरोधकांसोबत ठामपणे उभे आहोत. परंतु, आम्ही यूपीएचे भाग नाही. आम्ही आमची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
नितीश कुमारांची मागणी काय?
मागील काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून दरली आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले, पेगागस हेरगिरीची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी. इतके दिवस विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी केली जात आहे. आम्ही आजवर टेलिफॉन टॅपिंगचे ऐकले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: We are not a part of UPA said Shivsena MP Sanjay Raut news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं