मोदी-शहांना जी धमक वाघिणीने दाखवली, ती धमक वाघ हयातीत दाखवणार नाही?

लोकसभा : सध्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराअंती पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी, ममता बॅनर्जींच्या बेधडकपणाची चर्चा देशभर रंगली आहे. अमित शहांच्या प्रचार रॅलीनंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण भाजपने पश्चिम बंगालमधील वातावरण शेवटच्या टप्प्यात दूषित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जो ममता बॅनर्जी यांनी धर्याने परतवून लावला.
केवळ अमित शहाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच त्यांनी मागील २-३ दिवसांपासून फैलावर घेतले आहे. एकूणच जे इतर विरोधी पक्षांना जमलं नाही ते ममता बॅनर्जी यांनी बेधडकपणे परतवल असंच म्हणावं लागेल. एकाबाजूला पश्चिम बंगालमधील वाघीण भाजपाला फैलावर घेत असताना, दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रातील वाघ मात्र कागदी असल्याचं लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं.
भाजपने जराजरी दम दिला तरी महाराष्ट्रातील वाघ वेळोवेळी भूमिका बदलताना आणि भाजप सांगेल त्याप्रमाणे मान डोलवताना दिसला. बंगालची वाघीण बंगाली बाणा मोदींना आणि भाजपाला दाखवत असताना, महाराष्ट्रातील वाघाला गुजरातमध्ये येऊन जय गुजरात म्हणण्याची जणू तंबीच दिली होती का, असा अनुभव लोकसभा निवडणुकीतील प्रचारात आला. याच बंगालच्या वाघिणीला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटून स्वतःची राजकारणातील बार्गेनिंग पावर वाढवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील वाघाने केलेला सुद्धा देशानं अनुभवला. थोडक्यात कागदी वाघ आणि खरा खुरा वाघ म्हणजे काय ते देशाने मागील २-३ दिवसातील राजकीय घडामोडीतून अनुभवलं आहे असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं