मानवी तंत्र | तुमच्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी कळतो तुमचा स्वभाव - नक्की वाचा

मुंबई, ३० जून | कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, तुमच्या लहानसहान सवयी आणि तुम्ही केलेली छोटी-छोटी कामे तुमच्याबद्दल नकळतपणे अनेक गोष्टी सांगून जातात. ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा काही गोष्टी ज्यापासून तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, तसं न केल्यास लोकांचा तुमच्याबाबतीत गैरसमज होऊ शकतो आणि ह्यामध्ये तुमच्या प्रिय व्यक्तीसुध्दा असू शकतात.
जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बाबत रोजच्या आयुष्यात काळजी घ्यायला हवी:
* तुम्ही ज्यांच्यासोबत असता त्या लोकांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही जर त्यांच्या सोबत असलं तर त्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला जर कोणत्या गोष्टीत मदत हवी असेल आणि जर ती व्यक्ती सांगू शकत नसेल तर तुम्ही त्याला विचारू शकता. अशा वेळी तुमची काळजी घेण्याची वृत्ती दिसून येते .
* तुम्हाला तुमच्या लहानसहन गोष्टींचं भान राखण अतिशय आवश्यक आहे . उदाहरणार्थ कितीतरी वेळा लोक घराची किल्ली घ्यायला विसरतात किंवा घरातून निघताना घराचा दरवाजा बंद करायला विसरतात. अशी लोक आपल्या लहान-लहान गोष्टी सुद्धा बऱ्याचदा विसरून येतात. लक्षात ठेवा अशा गोष्टींमुळे तुम्ही हलगर्जी आहेत असा लोकांचा समज होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या.
* घरात अथवा घराच्या बाहेर कोणी झोपले असेल किंवा अभ्यास करत असेल तर तुम्ही जोरजोरात बोलता. अशा वेळी लक्षात घ्या की, तुमच्या बोलण्याने कोणाच्या झोपेत किंवा अभ्यासात व्यत्यय येत नाही ना. नाहीतर तुमच्यावर बेशिस्त असल्याचा टॅग लागू शकतो.
* बस किंवा ट्रेनने तुम्ही प्रवास करत असला तेव्हा तुमचं सामान किंवा पर्स तुम्ही बाजूच्या अथवा दुसऱ्या सीट वर ठेवता तुम्ही तुमचे पाय समोरच्या सीटवर ठेवत असाल तर असं करू नका. ही बाब तुम्हाला उध्दट श्रेणीमध्ये नेऊन ठेवेल.
* तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या जर करत नसाल तर तुमच्यामागे तुमच्याबद्दल बोललं जात आणि हसंही होत. त्यामुळे तुमचं बोलणं कधी कधी गांभीर्याने घेतलं जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की, जे तुम्ही बोलता त्याच आचरण तुम्ही करा.
* जी लोक इतरांच्या मागे त्यांच्याबद्दल वाईट बोलतात अशी लोकांना कोणी पसंत करत नाही. कारण त्यांना वाटतं की, तुम्ही त्यांच्याबद्दल ही इतरांसमोर वाईट बोलाल. म्हणून असं बिलकुल करू नका.
* अनेकदा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी तुम्ही मनाने काहीही उलटसुलट बोलू लागता. अशा वागण्याने लोकांमध्ये तुमची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा की, लोकांनी तुमचं बोलणं ऐकावं म्हणून काहीही चुकीचं बोलू नका जे अर्थपूण नसेल.
* जर तुम्ही उगाचच लोकांकडे टाईमपास करायला जाऊन बसत असाल आणि त्यामुळे तुमचा आणि त्यांचा दोघांचा ही वेळ वाया जातो असेल तर असं नका करू. आपला वेळ अशारीतीने वाया घालवण्यापेक्षा तो वेळ सार्थकी लावा. ह्यामुळे तुमची छाप चांगली पडेल आणि लोक चिडणार ही नाहीत.
* तुम्ही जेव्हा बाहेर जेवायला जाता तेव्हा आपल्या ताटातील खाणं टाकून दिलं जात, हे करणं अतिशय चुकीचं आहे. तसंच कुठे बाहेर जेवायला किंवा कोणाच्या घरी गेल्यावर जेवण घाई-घाईने खाण्यापेक्षा सावकाश हळू-हळू जेवा, म्हणजे आमंत्रितांना ही चांगलं वाटेल.
* जर तुम्ही लहानसहन गोष्टींवरून लगेच घाबरता किंवा चिंतित होत असाल तर ते सोडून द्या. कोणत्याही गोष्टी वरून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा त्यावर कोणता उपाय करता येईल याचा विचार करा.
* चूक झाल्यानंतर त्या बाबत स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपली चूक मान्य करून माफी मागा. यामुळे तुमचं इम्प्रेशन जास्त चांगलं पडेल.
* गाडी लावताना आपण आपल्याच वाहनाचा विचार न करता इतरांच्या देखील वाहनांचा विचार करावा कारण दुसऱ्या व्यक्तीला त्याच वाहन काढताना अथवा लावताना त्यामुळे अडचण होणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Which are small thing can tell you a lot about a persons nature news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं