चीनी सैनिकाला घेतले ताब्यात | प्रोटोकॉलनुसार चौकशी झाली सुरू

लडाख , ९ जानेवारी: भारत आणि चीन दरम्यान पुन्हा लडाख सीमेवर चिनी सैन्याने एलएसीमध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. सध्या भारतीय सैन्याने प्रोटोकॉलअंतर्गत एका चीनी शिपायाला ताब्यात घेतले आहे. अधिकृत वृत्तानुसार, एका चिनी सैनिकाला आदल्या दिवशी लडाखमध्ये भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. चिनी सैन्याने एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार विहित प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी केली जात आहे.
माहितीनुसार ८ जानेवारी रोजी लडाखमधील एलएसीजवळ भारतीय सीमेच्या आत चीनचा एक सैनिक पकडला गेला. या चिनी सैनिकाला पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याच्या भागात पकडण्यात आले. या सैनिकाने दिलेल्या जाबाबावर विश्वास ठेवल्यास त्याने आपण रस्ता चुकून भारताच्या हद्दीत आल्याचे म्हटले आहे. मात्र त्याने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारताच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.
दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. फायटर विमानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र दोन्ही बाजूंनी तैनात केली आहेत. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही अजूनही सीमावादाचा तिढा सुटलेला नाही. चीनच्या आक्रमकतेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर चिनी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
News English Summary: On January 8, a Chinese soldier was captured inside the Indian border near the LAC in Ladakh. The Chinese soldier was captured on the south shore of Lake Pangong. If you believe the answer given by this soldier, he has said that he came to the border of India by mistake. However, after he entered Indian territory, he was captured by Indian soldiers.
News English Title: Chinese Army soldier captured in Ladakh Chushul Sector news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं