Business Money Insurance | तुमच्या छोट्या-मोठ्या व्यवसायात कॅश वापर अधिक असतो?, मग मनी इन्शुरन्स देईल तुमच्या पैशाला संरक्षण

Business Money Insurance | कोणत्याही व्यवसायात जिथे मोठे रकमेचे व्यवहार असतात, तिथे चोरी किंवा दरोडा यांसारख्या जोखमे पासून तुमच्या पैशाचे संरक्षण होईल याची खातरजमा केली पाहिजे. मनी इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केल्याने चोरी, दरोडा, नुकसान या परिस्थितीशी जोखीम कमी होते. या मनी इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, तुम्ही तुमच्या नुकसानासाठी दावा करू शकता.
विमा पॉलिसी बचत आणि संरक्षण हे दोन्ही सुविधा प्रदान करतात. व्यवसायात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नुकसान भरून काढणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. बाजारात अनेक प्रकारचे विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. यापैकी एक असते, मनी इन्शुरन्स पॉलिसी, जी व्यवसायातील पैशाशी संबंधित जोखमीपासून संरक्षण प्रदान करते. मनी इन्शुरन्स चोरी आणि दरोड्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आपल्याला संरक्षण देते. तुम्ही मनी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये उपलब्ध असलेले उपलब्ध फायदे आणि पर्याय निवडू शकता आणि तुमच्या गरजेनुसार पॉलिसी मेकिंग ऍडजस्टमेंट करू शकता.
विमा सल्लागारांचे मत असे आहे की, कोणताही व्यवसाय ज्यामध्ये पैशाचे व्यवहार जास्त असतात, त्यात चोरी किंवा दरोडा यांसारख्या घटनांची जोखीम जास्त असते. मनी इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केल्याने अशा परिस्थितीशी संबंधित जोखीम कमी होते, आणि तुमचे होणारे नुकसानही टाळता येते. जर एखादी व्यक्ती अशा चोरी किंवा दरोड्याच्या घटनेला बळी ठरली असेल, आणि आपले पैसे गमावले असतील तर ती व्यक्ती मनी विमा इन्शुरन्स अंतर्गत त्याच्या नुकसानासाठी दावा करू शकते, आणि नुकसान टाळू शकते.
मनी इन्शुरन्समध्ये मिळणारे विमा कव्हर :
मनी इन्शुरन्समध्ये रोख, चेक, ड्राफ्ट, ट्रेझरी नोट्स, चलन आणि पोस्टल ऑर्डर यासारख्या सर्व प्रकारच्या लिक्विड फंडांचा समावेश होतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या विम्यासाठी भरावा लागणारा प्रीमियम खूप कमी आणि आपल्याला परवडणारा देखील आहे. या पॉलिसी मध्ये आपल्याला आर्थिक सुरक्षिता प्रदान केली जाते. आपण अनेकदा जीवन विमा, आरोग्य विमा आणि मोटार वाहन विमा पॉलिसी विकत घेतो परंतु आपले लक्ष कधीही व्यवसायातील पैसे आणि व्यवहारातील जोखमीवर आणि त्याच्या सुरक्षिततेकडे जात नाही.
मनी इन्शुरन्स पॉलिसीच्या मदतीने, प्रत्येक व्यक्ती जोखमी व्यवहारात आपल्या पैशाची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो. दुकानातील दरोड्यापासून ते चोरी अश्या सर्व घटना मनी इन्शुरन्स योजनेत समाविष्ट होतात, जे तुम्हाला संरक्षण पुरवतात.
अशा प्रकारच्या नुकसानीमध्ये सामान्यतः कोणत्याही चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे किंवा विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या हातातून पैसे गमावल्यामुळे किंवा विमाधारकाची फसवणूक झाल्यामुळे पैशाचे नुकसान होते, असे आर्थिक नुकसान भरून काढणे खूप कठीण जाते. अशा घटना किंवा प्रकरणे मनी इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत येत नाहीत. याशिवाय पूर, चक्रीवादळ, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कृतींमुळे होणारे नुकसान देखील मनी इन्शुरन्स विम्यात समाविष्ट होत नाही. म्हणून, मनी इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी, पॉलिसीच्या अटी आणि शर्ती नीट वाचूनच गुंतवणूक करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News title| Business money Insurance policies covers loss of money in business on 18 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं