Post Office Insurance | तुम्हाला पोस्ट ऑफिस देणार 299 रुपयांत 10 लाखांचा इंशुरन्स, कौटुंबिक फायदे जाणून घ्या

Post Office Insurance | आजच्या युगात विम्याला फार महत्त्व आले आहे. पण महागड्या प्रीमियममुळे लोक विमा करणं टाळतात, असं अनेक वेळा दिसून येतं. या पार्श्वभूमीवर टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विशेष ग्रुप ऍक्सिडंट प्रोटेक्शन विमा उतरविला असून, त्यात लाभार्थीचा १० लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार आहे.
प्रीमियम केवळ २९९ रुपये आणि ३९९ रुपये :
त्यात एका वर्षात केवळ २९९ रुपये आणि ३९९ रुपये प्रीमियमसह १० लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विम्याचे नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.
18 ते 65 वयोगटातील लोकांना :
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा एआयजी यांच्यात झालेल्या करारानुसार 18 ते 65 वयोगटातील लोकांना हे सामूहिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. याअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास, कायमस्वरूपी किंवा अंशत: पूर्ण अपंगत्व आल्यास, अर्धांगवायू झाल्यास दोन्ही प्रकारच्या विमा संरक्षणाला १० लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर या विम्यात अपघातामुळे रुग्णालयात दाखल होताना उपचारासाठी रु.६०,०००/- पर्यंतचा खर्च व ओपीडीमध्ये रु.३०,०००/- पर्यंतचा क्लेम या विम्यात आय.पी.डी.
विम्यात मिळणारे कौटुंबिक फायदे :
त्याचबरोबर वरील सर्व लाभांबरोबरच ३९९ रुपयांच्या प्रीमियम विम्यात दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख, दहा दिवस रुग्णालयातील रोजचा एक हजाराचा खर्च, दुसऱ्या शहरात राहणाऱ्या कुटुंबासाठी २५ हजार रुपयांपर्यंत वाहतूक खर्च आणि मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. या विमा सुविधेत नोंदणीसाठी लोक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Post Office Insurance TATA AIG Plan check details 17 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं