ना खासदारकी ना सत्तेत! प्रभू रामाचा आशीर्वाद राहुल गांधींसोबत, ज्या न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिर झळकलेले तिथेच राहुल गांधी झळकले

Brand Rahul Gandhi | भारतात भारत जोडो यात्रे दरम्यान सामान्य लोकांशी निगडित महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न उचलणाऱ्या राहुल गांधींची खासदारकी देखील मोदी सरकारने रद्द करून त्यांना संसदेच्या बाहेर केले. पण त्यानंतर त्यांनी थेट जनतेत जाऊन मोदी सरकारच्या धोरणांवरून, धार्मिक तेढ निर्माण करण्यावरून ते महागाई-बेरोजगारीवरून मोदी सरकारला लक्ष करत आहेत. सध्या कोणताही राजकीय पद किंवा खासदारकी सुद्धा नसताना देशभर नव्हे तर जगभरात त्यांना पसंती मिळत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या होर्डिंगवर झळकले. माजी खासदार सध्या तीन शहरांच्या सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि यापूर्वी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन डीसीचा दौरा केला आहे. आज ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये हजारो भारतीय अमेरिकनांना संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी हे खुल्या पत्रकार परिषद घेत आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे टेलिप्रॉम्प्टरचा उपयोग करून ते भाषण किंवा संवाद साधत नाहीत. पत्रकारांना कोणतेही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
पक्षाचे नेते आणि समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या दृश्यांमध्ये राहुल गांधी भारत जोडो यात्रेतील मोंटेजमध्ये लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. न्यूयॉर्कमधील व्यस्त क्षेत्र नेहमीच डिजिटल होर्डिंग्स तसेच 24/7 सेवा प्रदान करणाऱ्या विषयांनी उजळून निघते. जगातील सर्वात व्यस्त पादचारी क्षेत्रांपैकी एक, डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित होणे ही अनेकांची इच्छा असते.
३ ते ४ जून या कालावधीत ते हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड क्लबमध्ये विचारवंतांशी बैठका घेतील, दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील आणि सर्जनशील उद्योगातील यशस्वी भारतीय-अमेरिक व्यक्तींना भेटतील आणि न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील.
Rahul Gandhi takes New York’s Times Square! pic.twitter.com/8a0a0MdKTk
— Ashok Swain (@ashoswai) June 3, 2023
News Title : Brand Rahul Gandhi takes New York’s Times Square check details on 04 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं