Israeli Judicial Overhaul | इस्रायलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी मोदींच्या इव्हेंटप्रेमी मित्राच्या हालचाली, जनता रस्त्यावर उतरली

Israeli Judicial Overhaul | सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी कट्टर उजव्या विचारसरणीच्या सरकारने सुरू केलेल्या न्यायालयीन फेरबदलाच्या विरोधात इस्रायलमधील पाच लाखांहून अधिक लोकांनी शनिवारी दहाव्या आठवड्यात निदर्शने केली. हे आंदोलन देशातील आजवरचे सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे.
हायफासारख्या शहरांमध्ये विक्रमी संख्येने आंदोलक बाहेर पडले, तर तेल अवीवमध्ये सुमारे दोन लाख आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे समजते. सत्ताधारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नियोजित बदल मतदारांसाठी चांगले असल्याचे म्हटले असले तरी देशातील जनता या बदलांकडे न्यायालयीन स्वातंत्र्याला धोका म्हणून पाहत आहे आणि आपले काळी कृत्य उघड होऊ नये म्हणून इस्रायलमधील न्यायालयं स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सरकार हालचाली करत असल्याचं आंदोलक जनतेचं मतं आहे आणि तशा प्रकारच्या प्रतिक्रिया ते प्रसार माध्यमांना उघडपणे देताना काळजी देखील व्यक्त करत आहेत.
इस्रायल हुकूमशाहीकडे…
इस्रायलमध्ये दहशतवादाची लाट आपल्यावर येत आहे, आपली अर्थव्यवस्था कोलमडत आहे, पैसा देशाबाहेर जात आहे. इराणने नुकताच सौदी अरेबियासोबत नवा करार केला आहे. पण या सरकारला फक्त इस्रायलच्या लोकशाहीला चिरडून टाकण्याची काळजी आहे,” असं विरोधी पक्षनेते यायर लापिड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. तेल अवीवमधील आंदोलक तामीर गायत्साब्री यांनी रॉयटर्सला सांगितले की, “ही न्यायालयीन सुधारणा नाही. ही एक घातकी राजकीय क्रांती आहे जी इस्रायलला पूर्ण हुकूमशाहीकडे नेत आहे आणि इस्रायलने माझ्या मुलांसाठी लोकशाही राहावी अशी माझी इच्छा आहे.
न्यायाधीशांच्या निवडीमध्ये सरकारचा प्रभाव
या सुधारणांचा उद्देश न्यायाधीशांच्या निवडीमध्ये निवडून आलेल्या सरकारला अधिक प्रभाव देणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात निर्णय देण्याच्या किंवा कायदे रद्द करण्याच्या अधिकारावर मर्यादा आणणे हा आहे. या मुद्द्यामुळे इस्रायली समाजात लक्षणीय फूट पडली आहे आणि इस्रायलच्या लष्कराचा कणा असलेल्या सुरक्षारक्षकांनी आपला विरोध व्यक्त करण्याचे साधन म्हणून काम करण्यास नकार देण्याची धमकी देखील दिली आहे.
इस्रायली लष्करातही संताप
सोमवारी इस्रायली हवाई दलाच्या एका उच्चभ्रू स्क्वाड्रनमधील राखीव लढाऊ वैमानिकांच्या गटाने प्रशिक्षणाला उपस्थित न राहण्याचा इरादा जाहीर करून एक अभूतपूर्व पाऊल उचलले. मात्र, नंतर त्यांनी आपले मत बदलले आणि वरिष्ठांशी चर्चा करताना उपस्थित राहण्याचे मान्य केले. नेतन्याहू यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आंदोलकांनी रस्ते अडवून गुरुवारी निदर्शने केली. या गदारोळानंतरही सरकार ठाम राहिले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Israeli Judicial Overhaul enter 10th week check details on 14 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं