अमेरिकेत ग्रीन कार्ड ऐवजी बिल्ड अमेरिका व्हिसा

वॉशिंग्टन : अमेरिकेत मागील अनेक वर्ष विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते. मात्र आता ती पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे. परंतु आता केवळ लॉटरी पद्धतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुम्हाला अवगत असलेल्या उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच तुम्हाला अमेरिकेचा कायम वास्तव्याचा व्हिसा जारी केला जाईल असं निश्चित केलं आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढल्याचे समजते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं