ऑस्ट्रेलियात संसदीय निवडणुकीत प्रत्यक्ष निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली. देशभरातील जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच सत्तेत विराजमान होणार असे संकेत देण्यात आले.
परंतु एक्झिट पोलचे आकडे विश्वासार्ह नाहीत आणि ते खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोधी पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. कारण ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणूक नुकतीच पार पडली. दरम्यान तेथील मतदान प्रक्रिया आटोपल्यावर तेथील वृत्तसंस्थांनी एक्झिट पोल जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यापैकी बहुतांश एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षात असलेल्या लेबर पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. परंतु निकालाच्या दिवशी प्रत्यक्षात सत्ताधारी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील कंझर्वेटिव्ह पक्षाने दणदणीत विजय मिळवत एक्झिट पोलनी वर्तवलेला अंदाज खोटा ठरवला होता.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या प्रतिनिधी सभेत मॉरिसन यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला एकूण ७४ तर विरोधी लेबर पक्षाला ६६ जागा मिळाल्या. प्रतिनिधी सभेमध्ये बहुमतासाठी ७६ जागांची गरज असते. त्यामुळे आता मॉरिसन यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. दरम्यान त्रिशंकू सभागृहाच्या परिस्थितीत आपण आघाडी करून काम करू असे अपक्ष खासदार हेलन हेन्स यांनी सांगितले आहे. त्यामुळे, ऑस्ट्रेलियात उद्भवलेल्या याच परिस्थितीचा आधार घेत विरोधी पक्षांचे नेते २३ मे पर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरून चमत्कारिक निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं