NSG सदस्यत्व; ब्रिटनचा भारताला बिनशर्त पाठिंबा, पण चीनचा विरोध का ते चीननं स्पष्ट करावं

नवी दिल्ली : भारत एनएसजीचा सदस्य होण्यास पात्र असून त्यासाठी ब्रिटनचा बिनशर्त पाठिंबा आहे. परंतु भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय आहे ते स्वतः चीननं स्पष्ट करावं, असं मत सुद्धा ब्रिटनकडून नोंदवण्यात आलं आहे. एनएसजीच्या सदस्यत्वामुळे अनेक फायदे असल्यानं ब्रिटननं घेतलेली सकारात्मक भूमिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.
तसेच या पाठिंबा देताना गटात सामील होण्यासाठी भारत पात्र असल्याचं ब्रिटननं मत व्यक्त केलं आहे. एनएसजीमध्ये सामील होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व योग्यता भारताकडे असल्याचं सुद्धा ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. एनएसजीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर अणू व्यापारावर निगराणी ठेवण्याचं काम केलं जातं. ज्याचा भविष्यात भारताला फायदा होऊ शकतो.
भारत एक प्रतिष्ठीत देश असून तो एनएसजीचा भाग असायला हवा, अशी ठाम भूमिका ब्रिटेनने घेतली आहे. तसेच भारताच्या एनएसजी प्रवेशाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय आहे ते चीननं स्पष्ट करावं, असं सुद्धा म्हटलं आहे. कारण एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाला चीनचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, त्यासाठी काही दिवसांपूर्वी या विषयाच्या अनुषंगाने भारत आणि अमेरिकेचे दोन मंत्री भेटले होते. मात्र अद्याप तरी एनएसजी प्रवेशाबद्दल भारताला अमेरिकेकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही त्यामुळे अनेक गोष्टी अधांतरी आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं