VIDEO | मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण | व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला

व्हिएन्ना , ३ नोव्हेंबर: मुंबई शहरावरील २६/११ हा दहशतवादी हल्ला संपूर्ण भारत कधीही विसणार नाही. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सकाळी अचानक मुंबईवर अत्याधुनिक हत्यारं घेऊन हल्ला केला होता. पोलिसांसहित अनेक सामान्य मुंबईकरांनी यामध्ये स्वतःचा जीव गमावला होता. संपूर्ण शहरात दिवसभर धावपळ पाहायला मिळाली होती. तसाच प्रकार ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरातील लोकांनी अनुभवला आहे.
युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरात (Vienna terror attack) हल्लेखोरांनी तब्बल सहा शहरात तुफान आणि अंधाधुंद गोळीबार केला. CNN वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार ऑस्ट्रिया सरकारनं हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे घोषित केले आहे. सरकारनं या हल्ल्यात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले असले तरी स्थानिक प्रसार माध्यमांनी एकूण ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.
व्हिएन्ना पोलीस विभागाच्या माहितीनुसार या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकं गंभीर जखमी झाले आहेत आणि अद्याप मदतकार्य सुरूच आहे. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. या घटनेचे CCTV व्हिडीओ फुटेजही समोर आले आहेत. संबंधित व्हिडीओमध्ये हल्लेखोर रस्त्यावर असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात पोलिसही देखील जखमी झाले आहेत.
#viennaattack #attaquevienne #ataqueviena #vienaterrorist #terroristvienna #viennaterrorattack pic.twitter.com/Ci4MyAlD35
— Badnews.online (@Badnews42497772) November 2, 2020
News English Summary: In Vienna, a European country, the attackers stormed and fired indiscriminately at six cities. According to CNN, the Austrian government has declared it a planned terrorist attack. Although the government said only one person was killed in the attack, local media reported that a total of seven people were killed.
News English Title: In Vienna city the terror attackers stormed and fired indiscriminately at six cities News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं