ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता: पाकड्या मंत्री बरळला

इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर आधीच घाव घातला आहे. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले होते आणि त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले देखील होते. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने याआधीच रोखला आहे.
दरम्यान अशा तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. पाकिस्तानी सैन्यातील सशस्त्र जवानांचा ताफा लडाख सीमेजवळ पोहचत आहे. तसेच याठिकाणी पाकची लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहेत. शस्त्र घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने सी १३० एअरक्राफ्ट्सचा वापर केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तीन मंत्री शेख रशीद यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेला सतर्क करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला. संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा दौरा करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत पाकिस्तान काश्मीरसाठी लढत राहणार असल्याचा दावा शेख रशीद यांनी केला.
काही दिवसांपूर्वी शेख रशीद यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्या अंडे फेकण्यात आले होते. रशीद शेखने भारत-पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्ध होईल असं भाष्य केलं होतं. यानंतर जेव्हा ते लंडन येथे गेले होते तेव्हा लोकांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या अंडे फेकले होते. शेख रशीद नेहमी अशा वक्तव्यांनी चर्चेत येतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधान केलं होतं की, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला तर भारतीय उपखंडातील ते सर्वात मोठं युद्ध असेल आणि त्यामुळे याचा पूर्ण नकाशा बदलेल असा इशारा दिला होता.
काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. पाकचा खास मित्र असलेल्या चीन आणि सौदी अरेबियानेही उघडपणे पाठिंबा व्यक्त केला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडलाय. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. काश्मीरचा प्रश्न चिघळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं होतं.
तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रांत बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीरच्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा चीन आणि पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चीनने मागणी केल्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. सुरक्षा परिषदेतील देशांसमोर चीनने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यामुळे त्या प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अन्य देशांची साथ मिळू शकली नव्हती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं