महत्वाच्या बातम्या
-
क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा | चीन विरोधात मदत होणार
भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक BECA करार केला आहे. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. BECA करारामुळे भारत-अमेरिका लष्करी संबंध अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या डिजिटल इंडियात मोबाईल डेटा वेग मंदच | नेपाळ, पाकिस्तान सुद्धा पुढे
मोबईलवर इंटरनेटचा वापर ही काही आता चैनीची गोष्ट राहिली नसून ती एक जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे दिसून आले आहे. मोबाईल डेटा स्पीडमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अब्जाधीश बिर्ला कुटुंबियांसोबत अमेरिकेत वर्णभेद | रेस्टॉरंटमधून बाहेर काढले
देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबियांसोबत वर्णभेद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिर्ला कुटुंबियांसोबत ही घटना अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
भारत विषारी हवा सोडणारा देश | डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकास्त्र
कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. निवडणूक उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. “भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा डान्स व्हायरल
आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा देखील सध्या युएईमध्ये आहे. आरसीबीच्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा उपस्थित असते आणि युजवेंद्रला सपोर्ट करताना दिसते. चहल धनश्रीसोबत आनंदी क्षण घालवत आहे. धनश्रीला डान्सची अत्यंत आवड असल्याने ती समाज माध्यमांवर तिच्या डान्सचे व्हिडिओ अनेकदा शेअर करत असते.
5 वर्षांपूर्वी -
ऑटोमेशनमुळे जगभरात करोडो नोकऱ्या जाणार | स्वतःला अपग्रेडेड ठेवा अन्यथा...
भारतात नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच देशात करोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च २०२० पासून अद्यापपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पाच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीडीपीचा दर मायनसमध्ये पोहोचला. जो आपला शेजारील देश बांगलादेशच्या जीडीपीपेक्षाही खाली गेला. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० ची बेरोजगारीची आकडेवारीही समोर आली. यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ६.६७ टक्के नोंदवण्यात आला आहे. सध्याच्या ताज्या बेरोजगारीच्या आकडेवारीकडे पाहता ४५ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याच मार्ग मोकळा | केंद्राचा निर्णय
अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | चक्क डॉग रोबोट चालवत आहे त्याची रिक्षा
पूर्वीच्या काळी घोडागाडी किंवा गाढव घेऊन काही ठिकाणी खास प्रजातीचे श्वान गाडी ओढण्यासाठी तयार केले जात होते. बदलत्या काळानुसार या गोष्टी मागे पडल्या आणि चारचाकी गाड्या पेट्रोल-डिझेल CNG वर चालणाऱ्या गाड्या आल्या. बदलत्या काळानुसार आता रोबोट देखील हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयात मदत करण्यासाठी एकीकडे रोबोट तयार केले जात असतानाचा टांगा चालवण्यासाठी देखील रोबोटचा वापर केला जात असल्याचा एका व्हिडीओ समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नासा चंद्रावर 4G कनेक्टिव्हिटी मोबाइल नेटवर्क तयार करणार
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने चंद्रावर मोबाइल नेटवर्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी नासा फिनलंडच्या नोकिया कंपनीची मदत घेणार आहे. एकेकाळी मोबाइल क्षेत्रात दादा कंपनी असलेली नोकिया (Nokia) 4G कनेक्टिव्हिटी पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. याबाबत निकियाने अधिकृत प्रेसनोट देखील प्रसिद्ध केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं रिपब्लिकन आणि डेमोक्रेट पक्षांचे दोन्ही प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बाइडन हे आपला निवडणूक प्रचार आणखी धारदार करताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर तीव्र शाब्दिक हल्ला करताना दिसत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅट पक्षाचे बाइडन हे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. ‘अशा उमेदवाराविरूद्ध लढणे हा एक प्रकारे दबाव असून जर माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल.’ असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात | डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोनाचं लक्षण नव्हे | वाचा सविस्तर
भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कोरोना लस | स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम | चाचण्या थांबवल्या
कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोणतेही एक व्हॅक्सिन जगाला तारणार नाहीय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर लसीची गरज आहे. यामुळे काही कंपन्यांची औषधे यशस्वी ठरावी लागणार आहेत. सोमवारी कोरोना लसीच्या आशेला आणखी एक धक्का बसला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबविल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीनने भारताच्या सीमेवर तैनात केले 60 हजार सैनिक | अमेरिकेचा दावा
भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांच्या राजकीय आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र तणाव कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. चीनने भारतासोबतच्या उत्तर सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्हेनेझुएला चलनाचे अवमूल्यन | भाजीपाल्यासाठी बाजारात जाताना बॅगेतून नोटा
खनिज तेलाचा सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक असलेल्या व्हेनेझुएला देशाचे दिवस फिरले आहेत. मागील काही वर्षांपासून व्हेनेझुएलाची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. बाजारात येताना नागरिकांना बॅगा भरून नोटा आणाव्या लागत असल्याचे चित्र आहे. चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे आता सरकारकडून मोठ्या मुल्याच्या नोटा छापण्यात येणार आहेत. सरकार आता एक लाखाची नोट छापण्याची तयारी करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद | डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ संदेश
कोरोनाची बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ संदेश जारी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. करोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले. करोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याशी सामना करता येणाऱ्या औषधांची माहिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
भारताविरुद्ध युद्धासाठी तयार रहा | पाक लष्करप्रमुखांचे सैन्याला निर्देश
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सैन्याला युद्धास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
5 वर्षांपूर्वी -
WHOची मोठी माहिती | केव्हापर्यंत येणार कोरोना व्हॅक्सीन
जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्सीनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांच म्हणणं आहे की,’एक सुरक्षित आणि कारगर व्हॅक्सीन यावर्षाच्या शेवटापर्यंत तयार होऊ शकते.’ यासोबतच ते म्हणाले की, जगातील सर्व राजकीय मंडळींना व्हॅक्सीनचं समान वितरण करण्यास सांगितल्याचं म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
युद्ध झाल्यास चिनी लष्कर काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करेल अटल बोगदा | चीनचा दावा
अटल बोगद्याचे ३ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. १९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुक्त झालेला रुग्ण ९० दिवसांपर्यंत पसरवू शकतो कोरोना विषाणू | संशोधन
आपण किंवा आपले मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाच्या आजाराचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे का? आपण त्यांच्यासोबत राहात आहात का? तर आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकेच्या विविध रुग्णालयांमधून मिळालेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की COVID-19 रोगाचा SARS CoV-2 हा विषाणू गंभीररित्या संसर्गित झालेल्या रुग्णांच्या शरीरात ९० दिवसांपर्यंत राहू शकतो जे कोरोनामुक्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी