महत्वाच्या बातम्या
-
प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो अबे राजीनामा देणार
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देणार आहेत. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यामुळेच अबे पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे राजीनामा देणार असल्याचं वृत्त समोर येताच जपानचा शेअर बाजार कोसळला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक | ग्रेटा थनबर्गची नाराजी
करोना संकटामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. यादरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन कोमात | प्रकृती चिंताजनक
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती बिघडली असून, ती चिंताजनक आहे. किम जोंग उन कोमात गेले आहेत. किम जोंग उन यांच्या निधनाबद्दल सोशल मीडिया आणि अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. मात्र, अल्पावधीतच हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे पुढे आले. दरम्यान, किम जोंग उन यांनी आपल्या पदाचे आणि देशाच्या नेतृत्वाचे सर्वाधिकार त्यांची बहिण किम यो जोंग हिच्याकडे सोपवल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधात लस महत्त्वपूर्ण साधन | लवकरात लवकर आपल्याकडे ती असेल - WHO
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना नेमका कधी जाईल, असा प्रश्न प्रत्येकाल सतावत आहे. कोरोनासोबत जगणं सुरू आहे, पण ते तितकच कठिणही आहे. त्यामुळे, कोरोनाला हद्दपार करुन पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपला दिनक्रम सुरू व्हावा, असे लोकांना वाटते. मात्र, अद्याप ते शक्यच नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात बोलताना WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानॉम गेब्रयेसिस यांनी अंदाज व्यक्त केला आहे. साधारपणे 2 वर्षात या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येईल, असे गेब्रयेसिस यांनी म्हटलंय. त्यासाठी, जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन लसीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.
5 वर्षांपूर्वी -
रशियातील विरोधी पक्षातील नेते एलेक्सी यांच्यावर चहामधून विषप्रयोग | प्रकृती गंभीर
रशियाचे विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचे विरोधी एलेक्सी नवलॅनी यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की विमान प्रवासादरम्यान त्यांना कोणीतरी चहातून विष दिलं. नवलॅनी एका कामासाठी सायबेरियाला गेले होते आणि तेथून मॉस्कोला परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवलॅनी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे फ्लाइटमधून आपात्कालिन लँडिंग करावी लागली.
5 वर्षांपूर्वी -
कथित स्वतंत्र हिंदू राष्ट्र स्थापल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ कैलासची स्थापना | स्वामी नित्यानंद
बलात्काराच्या आरोपा नंतर देश सोडून गेलेला ‘स्वयंभू महाराज’ नित्यानंदने एका स्वतंत्र हिंदू देशाचा स्थापना केल्याचा कथित दावा केला होता. नित्यानंद जेव्हा देशापासून पळाला तेव्हापासून त्याचा शोध भारतातील पोलीस यंत्रणा घेत आहे. परंतु आता त्यांने एक कथित देश बनविला आहे असं समोर आलं होतं. जगातील कोणत्या कोपऱ्यात नेमका लपला आहे हे अद्याप माहित नसलं तरी नित्यानंद यांनी संबंधित देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपासंबंधित पोस्ट आणि त्या भूमिकेवरून फेसबुक'कडून अखेर खुलासा
कोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला होता. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला होता.
5 वर्षांपूर्वी -
द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस नकार | भाजपावर फेसबुक मेहेरबान
अमेरिकेत लवकरच निवडणुका होत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पक्षपाती भूमिका घेण्याबाबतचा आरोप झालेले ट्विटर आणि फेसबुकने नवे नियम तयार केले. आता भारतातही फेसबुकच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे टिकटॉकला ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे आदेश | ट्रम्प प्रशासनाकडून झटका
ट्रम्प यांनी बाइटडान्सला अमेरिकन यूझर्सकडून घेण्यात आलेल्या अथवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत देण्यासही सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील टिकटॉचा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर मायक्रोसॉफ्ट अथवा इतर कुठलीही कंपनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय विकत घेऊ शकली नाही तर देशात टिकटॉक बॅन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. त्यांनी यासदर्भातील कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प सरकारकडून H-1B व्हिसाधारकांना मोठा दिलासा | भारतीयांना सर्वाधिक फायदा
अमेरिकेने एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिसाधारकांना निवडक प्रकरणात अमेरिकेत येण्याची परवानगी मिळावी म्हणून नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अधिकृत जागतिक घोषणा | जगातील पहिली कोरोना लस रशियाने बनवली
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकचं नाही तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे. माहितीनुसार ही लस मॉस्कोच्या गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केलं आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचं काम सुरु करेल आणि मोठ्या संख्येने लसीचे डोस तयार करण्यावर त्यांचा भर असेल.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू
भारतात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Covid19 Vaccine | १२ ऑगस्टला जगातील पहिल्या लसीचं रशियात रजिस्ट्रेशन होणार
जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 7 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत तर 80 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारताच्या अडचणी वाढणार | श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना बहुमत
भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळालं आहे. आज आलेल्या निकालांमध्ये श्रीलंकेतील २२५ जागांपैकी केवळ श्रीलंका पीपल्स पार्टीनं १४५ जागांवर विजय मिळवला. तर सहकारी पक्षांसोबत त्यांचा एकूण १५० जागांवर विजय झाला आहे. पक्षाला एकूण ५९.९ टक्के मतं मिळाली.
5 वर्षांपूर्वी -
जगभरात कोरोनामुळे प्रत्येक १५ सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे
भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
काल हॅकर्सनी पाकिस्तानी न्यूज चॅनल डॉन'वर तिरंगा फडकवला
पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक भारताचा झेंडा फडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देण्यात आल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलवर भारताचा झेंडा फडकल्यानंतर चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्का ! ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काही दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
त्या भूभागावरून मनीषा कोईराला नेपाळ सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे
भारताच्या कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भागांवर नेपाळनं दावा केला होता. तसंच हे भाग आपल्या नकाशातही सामिल करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अधिकाऱ्यांनी नेपाळच्या प्रशासनाला यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. तसंच नेपाळी नागरिक अवैधरित्या या प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे दोन्ही देशांसाठी त्रासदायक परिस्थितीत निर्माण होईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. परंतु यानंतर नेपाळनंही भारताला एक पत्र लिहित भारतीयांचा अवैधरित्या होणारी ये-जा थांबवा, असा इशारा भारतानं नेपाळला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचा इशारा नेपाळने धुडकावला, म्हणाले कालापानी प्रदेश आमच्याच नागरिकांचा
भारताच्या कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भागांवर नेपाळनं दावा केला होता. तसंच हे भाग आपल्या नकाशातही सामिल करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अधिकाऱ्यांनी नेपाळच्या प्रशासनाला यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. तसंच नेपाळी नागरिक अवैधरित्या या प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे दोन्ही देशांसाठी त्रासदायक परिस्थितीत निर्माण होईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. परंतु यानंतर नेपाळनंही भारताला एक पत्र लिहित भारतीयांचा अवैधरित्या होणारी ये-जा थांबवा, असा इशारा भारतानं नेपाळला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मॉर्डना कपंनीची कोरोना लस चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये....तर मोठं यश
मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या फेजमध्ये एकाचवेळी मोठया प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या फेजच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. या फेजमधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल. अमेरिकेला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १.४६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत दररोज करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. याआधी मानवी परिक्षणात मॉर्डनाची लस यशस्वी ठरली होती.
5 वर्षांपूर्वी