महत्वाच्या बातम्या
-
उ. कोरियात पहिला रुग्ण सापडताच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
जगभरातील कोरोना संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनचा जिगरी दोस्त मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरियालाही आता कोरोनाचा झटका बसला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण आढळल्याचे कळताच या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी थेट देशभरात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तसेच किम यांनी स्वतःच्या देशात पहिल्यांदाच मास्कच्या सक्तीचे फर्मान काढले असून मास्क न घालणाऱ्यास दंड नव्हे तर थेट सक्त मजुरीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज आपण झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनसमोर दयेची भीक मागावी लागेल - माईक पॉम्पेओ
कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. संबंध बिघडल्यापासून अमेरिका चीनला सातत्याने धक्के देत आहे. आता ट्रम्प सरकार चीनला यूएस डॉलर सिस्टममधून (SWIFT) बाहेर काढण्याची अथवा त्याचा अॅक्सेस कमी करण्याची शक्यता आहे. चिनी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बिजिंगची चिंता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत चीनमधील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली, भारताकडून सज्जतेची तयारी
लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनबरोबर संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आता सैन्य माघारीची आणि सैनिक संख्या कमी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. तिथे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली असून तणावाची स्थिती ही दीर्घकाळ राहणार आहे. त्या दृष्टीने भारताने आपली तयारी सुरु केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
७२ तासांमध्ये दूतावास खाली करण्याचे चीनला आदेश, चीनने लगेच गोपनीय कायदपत्रं जाळली
अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत जात आहे. ट्रम्प सरकारने या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी चीनला ह्युस्टनस्थित (Houston Consulate) महावाणिज्य दूतावास ७२ तासांत बंद करण्याचा आदेश दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे काय आता? घरातच कोरोनाची लागण व्हायचा धोका जास्त, दक्षिण कोरियातील निष्कर्ष
ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीचे परिणाम जाहीर झाले आणि जगभरात आशेचा किरण निर्माण झाला. चाचण्या यशस्वी झाल्याच्या या बातमीने गेले 4 महिने कोरोनामुळे नकारात्मक झालेलं वातावरण एकदम आनंदी झालं. कारण या लशीची (Covaxin) निर्मिती भारतातही होणार आहे. AstraZeneca कंपनी ही लसनिर्मिती करणार आहे आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला असून लशीचे एक अब्ज डोस Serum Institute of India उत्पादित करणार आहे. आता लवकरच लस बाजारात येणार, अशी आशा निर्माण झाली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या बातमीवर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका सुद्धा चीनविरुद्ध युद्ध यंत्रणा सज्ज ठेऊन...माजी रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांची माहिती
भारतीय वायुसेनाने सोमवारी राफेल विमानाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वायुसेनाने सांगितले की 5 राफेल विमानं जुलै 2020 पर्यंत भारतात येणं अपेक्षित आहे. ही विमानं 29 जुलै रोजी वातावरणाच्या बदलानुसार वायु सेना स्टेशन अंबालामध्ये सहभागी केलं जाईल.
5 वर्षांपूर्वी -
रिचर्ड होर्टन यांचे एक महत्वाचं ट्विट 'उद्या व्हॅक्सीन, फक्त सांगत आहे'
जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जपानचे ५७ जपानी कंपन्यांना चीनमधले प्लांट जपानमध्ये हलवण्याचे आदेश
चीनच्या विस्तार वादाला आणि युद्धखोर नीतीला संपूर्ण जग कंटाळ्याचं पाहायला मिळत आहे. केवळ भारतच नव्हे तर तैवान आणि जपानसारखे देश सुद्धा स्वतःला चीनपासून असुरक्षित समजू लागले आहेत. चीनचे अमेरिकेसोबत देखील संबंध अत्यंत टोकाला गेल्याचचं पाहायला मिळत आहे. जगभरातील देश कोरोनाचं उगमस्थान असलेल्या चीनपासून स्वतःला आर्थिकदृष्ट्या दूर ठेवणं पसंत करत असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालं आहे. त्यात आता जपानने जे पाऊल उचललं आहे त्यावरून चीन पुरता हादरण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या आकडेवारीवर अमेरिकन माध्यमांना शंका
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा - राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी
इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. शनिवारी एका दिवसात इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती रुहानी यांनी टीव्हीवर देईल. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात अशीही धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस निर्मितीवरून अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि कॅनडामध्ये वाद
जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून अद्यापही करोनावरील लस उपलब्ध न झाल्याने रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भयंकर! अमेरिकेत मागील २४ तासांत ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आतार्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत तब्बल ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३५ लाख ६० हजार ३६४वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ९७४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या १ लाख ३८ हजार २०१ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अॅपवर लक्ष ठेऊन, अमेरिकेत खटला दाखल
गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अॅपवर लक्ष ठेऊन असल्याच्या आरोपाखाली आणि वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेत Google विरुद्ध मोठा खटला दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
Twitter वर सर्वात मोठी हॅकिंग, दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स सुद्धा हॅक
माइक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर बुधवारी रात्री मोठा हल्ला झाला. ट्विटर कंपनीसाठी ही रात्र आव्हानात्मक होती. बराक ओबामा, बिल गेट्ससह अनेक मोठ्या व्यक्तींचे अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर कंपनीने अनेक जणांचे अकाऊंट बंद केले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सकडून बिटकॉइनच्या रुपात दान मागण्यात येत होतं. दरम्यान, ट्विटने ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
5 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’...जगाची उत्सुकता वाढली
सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Google चा मोठा निर्णय, Jio App मध्ये तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
रशियानंतर अमेरिकेतील मॉर्डना कंपनीकडून कोरोना लस बाबत आनंदाची बातमी - सविस्तर वृत्त
जगभरात कोरना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. आता याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. करोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
नजीकच्या काळात पूर्वीसारखी सामान्य स्थिती होणे अत्यंत कठीण - WHO'चं भाकीत
जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शाळा सुरु करण्याची घाई नको आणि शाळांना राजकारणात ओढू नका - WHO'चा इशारा
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये संसर्ग झालेल्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते, भारतीय अयोध्याही बनावट - नेपाळचे पंतप्रधान
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सतत भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी, सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या तयार केली असल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीराम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचं ते म्हणाले आहेत. यापूर्वी ओली यांनी, भारत त्यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी कट रचत असल्याचंही म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी