महत्वाच्या बातम्या
-
कोरोना लस बनविण्यात रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाची बाजी, सर्व चाचण्या यशस्वी
जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीचे उत्पादनही काही देशांमध्ये सुरू होत आहे. भारतातही कोरोना लसीच्या ह्युमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, पाकिस्तानचा दावा
पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधन यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनाचं थैमान, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण
जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित दोवालांमुळे नव्हे, भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या ३० जूनचा चर्चेचं फलित - चीन परराष्ट्र मंत्रालय
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होतोय, पण WHO याबद्दल गंभीर नाही - शास्त्रज्ञांचा दावा
जगात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रसार नक्की चीनमधून झाला की नाही? याचा शोध सध्या जागतिक आरोग्य संघटना घेत आहेत. कोरोनाव्हायरसच्या बाबतीत चीनला मदत केल्याच्या आरोपाचा सामना करणारी WHO आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात WHOच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरतो, परंतु WHO याबद्दल गंभीर नाही आहे, असा आरोप या वैज्ञानिकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेग पुन्हा पसरतोय, चीनमध्ये हाय अलर्ट
कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कर सज्ज, तर पाकिस्तान-चीनी लष्कर मोठा दगा करण्याच्या तयारीत
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या हिंसाचारनंतर लडाखमध्ये एलएसीवर भारतीय वायुसेना हाय अलर्टवर आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉरवर्ड बेसवर जाऊन चीनविरोधात रणशिंग फुंकले. तसेच, भारतीय वायुसेनाच्या विविध विमानं सीमेवर तैनात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फ्रान्समधील बिघडलेल्या कोरोना परिस्थितीची जवाबदारी स्वीकारून पंतप्रधानांचा राजीनामा
फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी कोरोना व्हायरसमुळे राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. हे फेरबदल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची स्वतःची विश्वासार्हता वाढवणार होते आणि पुन्हा निराश झालेल्या मतदारांची मने जिंकतील. कोरोना संकटाच्या वेळी पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमधील वादाला चीन जवाबदार..अमेरिकेची प्रतिक्रिया
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून कठोर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. शिवाय, सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनलाच जबाबदर धरण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, आठवडाभर सुरू असलेली जनमत चाचणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे पुढील १६ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनी पोलिसांनी हाँगकाँगमध्ये संतप्त आंदोलकांवर मसाल्याचे फवारे मारले
हाँगकाँगवासियांची स्वायत्तता हिरावून घेणाऱ्या चीन सरकारच्या नव्या सुरक्षा कायद्याविरोधातील मे महिन्यापासून जनतेने तीव्र आंदोलन सुरु केलं. मात्र आंदोलन सहन न करण्याचे ठरविलेल्या चीनधार्जिण्या हाँगकाँग प्रशासनाने मोठा फौजफाटा वापरत कारवाई केली होती आणि २५० आंदोलकांना अटक करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी पॅलेट गन आणि पेपर स्प्रेचा वापर केला होता.
5 वर्षांपूर्वी -
एकाबाजूला चीनच्या भारतासोबत बैठका, दुसरीकडे सीमेवर २० हजार जवान तैनात केले
कालच चुशुलमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यासाठी दोन्ही बाजूने सैन्य कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं वृत्त पीटीआयने लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
चीनी नागरिकांनी बॅन करावं असं भारतीयांकडे काय आहे?, चीनने डिवचल्याने आनंद महिन्द्राचं ऊत्तर
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
चीनमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या, माध्यमसमूहांशी संबंधित वेबसाइट बॅन, व्हीपीएन सुद्धा नियंत्रित
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठा दहशवादी हल्ला, 5 जण ठार
पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस उप-निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षक ठार झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जिओ न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर २-३ शिल्लक असलेली लक्षणं सुद्धा कोरोनाशी जोडली गेली
देशात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं. परंतु अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत एका दिवसात ४० हजार नवे रुग्ण, टेक्सास व फ्लोरिडात पुन्हा निर्बंध
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, एका दिवसात तब्बल ४० हजार नवे रुग्ण आढळल्याने तेथील दोन प्रांतांमध्ये काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टेक्सासच्या गव्हर्नरनी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर फ्लोरिडामधील रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर, जगभर कोरोनाचे ५ लाख बळी
गेल्या ६ महिन्यांपासून जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ कोटीवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने एक कोटींचा टप्पा ओलांडला. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. पण ती आशा फोल ठरली आहे. एप्रिल, मे आणि जून या ३ महिन्यांच्या कालावधीत ९० टक्के कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, असे या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनकडून पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी, दक्षिण किनाऱ्यावर सैन्याची जमवाजमव
चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.
5 वर्षांपूर्वी -
लस कोरोनापासून संरक्षण करेल, संसर्गही रोखेल पण...पुढे काय म्हणाले बिल गेट्स
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सर्वच देशात सुरू आहे. मात्र लसीचा शोध लागण्यानंतरही आपल्याला कोरोनाची बाधा होणारच नाही, अशी खात्री देता येणार नाही, अशी भिती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी