महत्वाच्या बातम्या
-
खोदकामात मजुराला २ मौल्यवान दगड सापडले, किंमत मिळाली २५ कोटी
नशिबात असेल तर तुम्ही कोण, कुठे आणि काय करता याला महत्व नसते. कारण एका रात्रीत नशीब बदलू शकते याचा अनुभव तंजानिया येथे खाणीत काम करणाऱ्या मजुराला येत आहे. खाणीत खोदकाम करताना मजुराला दोन मौल्यवान दगड सापडले.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या हालचाली पाहून अमेरिका भारताच्या मदतीला सैन्य पाठविणार
आशियातील चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युरोपमधून आपले सैन्य कमी करुन आशियामध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात जर्मनीपासून होणार आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या ५२ हजार अमेरिकन सैनिकांपैकी ९,५०० सैनिक आशियामध्ये तैनात करणार आहे. पूर्वे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनने भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याने अमेरिका हे पाऊल उचलत आहे. दुसरीकडे व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्सला चीनकडून धोका आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑक्सफर्डच्या AZD1222 या कोरोना लससाठी अनेक देशांकडून नोंदणी सुरू
एकाबाजूला भारतात करोनाच्या रुग्णांना बर करण्याचा दावा करत पतंजलीनं शोधून काढलेलं औषध कायदेशीर वादामुळे चर्चेत आहेत. परवानगीच्या वादा अडकलेल्या या औषधाची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी आणण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान सरकारनं या औषधाच्या विक्रीवर बंदी आणली आहे. “कुणीही बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या करोनावरील औषधाची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेपाळच्या पंतप्रधानांवर राजीनामा देण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला
भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल.
5 वर्षांपूर्वी -
७ दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर जाणार - WHO'चा गंभीर इशारा
कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
आता पूर्व दौलत बेग ओल्डीमध्ये चीनकडून सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरूवात
पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्ह असतानाच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्याची समोर येत आहे. पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडल्यास शरीरातील कोरोनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला. वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या coronavirus कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला.
5 वर्षांपूर्वी -
चीन विश्वासघात करतोय? पँगोंग त्सो तलाव परिसरात चिनी सैन्य तैनात
नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळाले होते. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी रशियाआणि ऑस्ट्रेलियाचा भारताला पाठिंबा
चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषद (यूएनएससी) मध्ये कायम सदस्यत्व देण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यतेसाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी सुधरायचे नाही...युलिन शहरात ‘डॉग मीट फेस्टिवल’चं आयोजन
चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता वुहान शहर हे कोरोनाचं केंद्र झालं होतं. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर वुहानमध्ये पुन्हा एकदा क्लस्टर ट्रान्समिशन दिसून आलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यावर सकारात्मक चर्चा
नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय सैन्याकडून चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचं चीनकडून मान्य
६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली होती.
5 वर्षांपूर्वी -
चीन दगाबाजीच्या तयारीत? लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीनची लढाऊ विमानं सज्ज
गेल्या आठवड्यात गलवान भागात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील हालचाली वाढल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे लष्कराला अधिकचे अधिकार मिळाले आहेत. लेहमध्ये मिग-२९ विमानं आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यानंतर चिनी सैन्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीननं लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीनकडून नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण निर्मिती, रेडिओवर भारतविरोधी गाणी
भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या आणि नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. विशेष म्हणजे भारताशी वैर पत्करून चीनशी मैत्री करण्यावर नेपाळने भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
८१ देशांमध्ये कोरोना पुन्हा धुमाकूळ घालणार, WHO ने दिला इशारा
कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला, असं कोणाला वाटत असल्यास हा चुकीचा समज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संसर्गाच्या ‘नवीन आणि धोकादायक’ अवस्थेचा इशारा दिला आहे. WHOचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी शुक्रवारी सांगितलं की, जग कोरोना संसर्गाच्या नवीन आणि धोकादायक टप्प्यात आहे. अनेक लोक घरांत बंद राहून कंटाळले आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही सुधारली नाही. कोरोना व्हायरस अजूनही वेगात पसरत आहे.
5 वर्षांपूर्वी -
डियाओस बेट ताब्यात घेण्यावरून चीनची जपानला सैन्य कारवाईची धमकी
भारतात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्र्यांनी आढावा बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमक वृत्तीला उत्तर देण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आतापासून भारत सीमेचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणात्मक पद्धतींचा अवलंब करेल. पूर्वेकडील लडाख व इतर क्षेत्रातील चीनच्या कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात राष्ट्रवादाला खतपाणी घालणाऱ्यांमुळे भारतीय फसणार नाहीत हीच अपेक्षा - ग्लोबल टाइम्स
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत, परिस्थिती अत्यंत कठीण आहे - डोनाल्ड ट्रम्प
गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमधील घडामोडींवर अमेरिकेचे लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत. परिस्थिती अत्यंत कठीण आहे.’
5 वर्षांपूर्वी -
चीनसोबतच्या मैत्रीवरून नेपाळमधील सत्ताधारी नेपाल कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट
भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. दुसरीकडे भारताशी वैर घेऊन चीनशी मैत्री वाढविण्याच्या मुद्द्यावरून नेपाळमधील सत्ताधारी नेपाल कम्युनिस्ट पार्टी मध्ये उभी फूट पडली आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या व नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. शुक्रवारी झालेल्या या बैठकीमध्ये नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.
5 वर्षांपूर्वी -
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास त्याचा परिणाम भारतीयांच्याच जीवनावर होईल - ग्लोबल टाइम्स वृत्त
भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे आणि चीनच्या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याच्या उद्देशाने सरकारने योजना तयार केली आहे.
5 वर्षांपूर्वी