महत्वाच्या बातम्या
-
अनेक देशात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण समोर येतील, सरकारांनी सज्ज रहावं - WHO
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी जगाला कोरोना विषाणूच्या साथीच्या नव्या आणि धोकादायक अवस्थेविषयी इशारा दिला आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन असूनही कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीत हा विषाणू असल्याचे उघडकीस आले तेव्हा असा इशारा देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई २६/११ हल्ला : मास्टरमाईंड तहव्वूर हुसैनला अमेरिकेत अटक
मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ हल्ल्याचा कट रचलेल्या मास्टर माईंड दहशतवादी तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेत अटक करण्यात आलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधून राणाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राणाचं भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. राणा हा पाकिस्तान – कॅनडाचा नागरिक असून अमेरिकेने या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शिक्षाही केली होती.
5 वर्षांपूर्वी -
जगभर कोरोनावरील लस संदर्भात संशोधन, रशिया सर्वात पुढे - सविस्तर वृत्त
चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप म्हणजे सिनोफार्मने केलेल्या लस चाचणीतून अँटीबॉडीज तयार झाल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरस विरोधात या अँटीबॉडीज तयार होणे खूप महत्वाचे आहे. जर्मनीची बायोटेक फर्म क्यूअरवॅकने करोना व्हायरसवर लस बनवली असून त्यांनी मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत. १६७ तंदुरुस्त स्वयंसेवकांपैकी १४४ जणांना लसीचे इंजेक्शन देण्यात येईल. क्यूअरवॅक ही लस निर्मिती करणारी दुसरी जर्मन कंपनी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांवर ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर WHO'कडून बंदी
देशात एकीकडे कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना अद्याप लस किंवा औषध मिळालेले नाही. अशातच सध्या सर्वच देश कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. सॉलिडॅरिटी ट्रायलवर ही बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशा मंजूर, उत्तराखंडमधील तीन भूभागांवर दावा
भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना आज नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयकावर मतदान होणार आहे. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - चीनकडून भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात
लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये असणाऱ्या भागात १५-१६ जूनला रात्री भारत आणि china चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. हे स्वरुप इतकं हिंसक होतं की यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. शेजारी राष्ट्राच्या अर्थात चीनच्या सैन्यातील जवळपास ४३ जवानांनाही यात प्राण गमवावे लागले. सीमावादाच्या या मुद्द्याला मिळालेलं चिंता वाढवणारं हे वळण पाहता चीननं कांगावा करण्यासही सुरुवात केली.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अमेरिकेची प्रतिक्रिया
लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
गैरसमजांत राहू नये, चीनची लष्करी ताकद भारताच्या कितीतरी पटीने अधिक - ग्लोबल टाईम्स
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरतंय ‘डेक्सामेथासोन’ औषध....सविस्तर
डॉक्टरांना कोरोना विषाणूवरच्या उपचारांसाठी प्रभावी औषधाची माहिती मिळाली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे. या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढील २ आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील - WHO
जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. मात्र आता ही परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. कारण पुढील दोन आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मागील १५ दिवसांत अशीच परिस्थिती दिसून आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आनंदाची बातमी! जगात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगातील एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे यावर देखरेख करणार्या जागतिक पोर्टल वर्ल्डमीटर या संस्थेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे हजारो मृत्यूमुखी आणि श्वेतवर्णीय हिंसक आंदोलन; ट्रम्प यांना निवडणुकीत पराभवाची चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की या महिन्यापासून ते आपली निवडणूक सभा सुरू करणार आहेत. दरम्यान त्यांनी चर्चेत असलेल्या सर्व आशंका फेटाळून लावल्या आहेत. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर कार्ययालय सोडून निघून जाईन.
5 वर्षांपूर्वी -
भारतात इटलीसारखी स्थिती निर्माण होणार, अमेरिकन वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांचा दावा
कोरोनाच्या संसर्गावर देखरेख ठेवणाऱ्या अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांनी भारताला सडलेले सफरचंद संबोधले आहे. भारत करत असलेल्या कोरोनाच्या उपाययोजनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .प्रा .स्टीव्ह हॅक यांनी भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर देखील टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उच्च शिक्षित भारतीयांचं अमेरिकेत नोकरीच स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प घेणार मोठा निर्णय
भारतात आयआयटी करून बहुतांश विद्यार्थी अमेरिकेला जातात. उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुण, तरुणी पाहतात. मात्र आता हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच-१बी (H1-B) व्हिसासह सर्व प्रकारचे एम्पॉयमेंट व्हिसा रद्द करण्याच्या विचारात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताच्या सीमेवर नेपाळकडून अंदाधुंद गोळीबार; दोन जखमी, एकाचा मृत्यू
हिंदुस्थानचा काही भाग नेपाळच्या नकाशात त्यांच्या हद्दीत दाखवल्याने दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण असतानाच बॉर्डरला लागून असलेल्या बिहारमधील गावात नेपाळ पोलिसांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात मोहोबा गावातील एकाचा मृत्यू झाल असून दोघे जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार नेपाळ पोलिसांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अद्यापही कोरोनाची धोका टळलेला नाही, जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडते आहे - WHO
जगभरात कोरोनाचा प्रसार थांबता थांबत नाही आहे. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. मात्र सर्वांना चिंता होती ती, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने एक चांगली बातमी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताने चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळतील - ट्रम्प
अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चीनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतानं आतापर्यंत ४० लाख जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काही भारतीय माध्यमांची कपोकल्पित सूत्र व त्यांच्या वृत्तानंतर दाऊदच्या भावाकडून खुलासा
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. दाऊदला सैन्याच्या रुग्णालयात दाखल केल्याचं देखील बोललं जात होतं. पण आता त्याच्या भावाने याबाबत हा खुलासा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्त्राईलला प्रयोग अंगलट; शाळेतील २६१ मुलांना कोरोना, ६८०० मुलं क्वारंटाईन
इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला आहे. शाळेतील तब्बल २६१ मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर जवळपास ६८०० मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी