महत्वाच्या बातम्या
-
भारताच्या उत्तर सीमेवर चीनच्या मोठ्याप्रमाणावर सैन्य हालचाली, अमेरिकेकडून संताप
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रे आणून उभी केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आधी या हुकूमशहा चीनने संपूर्ण जगापासून कोरोना व्हायरस महामारी लपविली आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात लोटले. त्यानंतर चीन हॉंगकॉंगमधील लोकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटत आहे.
5 वर्षांपूर्वी -
रशियाने विकसित केलेलं 'एव्हिफेव्हीर' औषध कोरोनावर प्रभावी ठरतंय...सविस्तर
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या संकटाने आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. या धोकादायक आजारावर मात करण्यासाठी सर्वच राष्ट्र प्रभावी औषधाच्या शोधात आहे. रशियाने या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही नवी लस लवकरच रुग्णांच्या उपाचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाव्हायरस कमकुवत होत असल्याचा दावा WHO'ने फेटाळला..काय म्हटलं?
कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाव्हायरस आता कमकुवत होत असल्याचा इटलीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा
जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळं भारतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये या व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे बरीच आव्हानं पाहायला मिळत आहेत. यातीलच सर्वाधिक मोठं आव्हान म्हणजे देशातील रुग्णांचा सातत्यानं वाढणारा आकडा.
5 वर्षांपूर्वी -
पावसाच्या ओलाव्यामुळे कोरोना आणखी पसरु शकतो, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ
मान्सून भारतात दाखल झाला आहे. हवामान खात्यानेही याची माहिती दिली आहे. पण आता कोरोना विषाणूवर पावसाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. २०२० चा पाऊस हा कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल हे पाहावं लागेल. कोरोना विषाणूवरील पावसाच्या परिणामाबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तर आंदोलनकर्त्यांना दहशतवादी घोषित करणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. मिनियापोलिसमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. अमेरिकेच्या ५ मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन नियम शिथिल केल्यास कोरोना पुन्हा गंभीर रूपात समोर येईल - शास्त्रज्ञांना शंका
नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. त्यामुळे कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आखाती देशांमध्ये अडकलेल्या ३ हजार भारतीयांसाठी मराठी उद्योजकाचा पुढाकार
कोरोना संकटामुळे जगभरात विविध देशांमध्ये भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना केंद्र सरकार एअर इंडियाच्या साहाय्याने वंदे भारत अभियान सुरू केले आहे. असेच सुमारे अडीच लाख भारतीय आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. त्यातील १८०० ते दोन हजार मराठी नागरिकांचा समावेश आहे. आखाती देशात अडकलेले भारतीय देशातील अन्य विमानतळांवर या अभियानांतर्गत दाखल होत आहेत. पण मुंबईसाठी एकही विमानसेवा नाही.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत हिंसाचार सुरुच, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित ठिकाणी
कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका-चीनमधील कोल्ड वॉरपासून दूर राहा...चीनची भारताला धमकी
चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या लष्कराकडून तैवानला थेट युद्धाची धमकी
एकीकडे कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी, युरोपीय युनियनने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव डब्ल्यूएचओच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी चीनने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीन नेहमीच काही गोष्टी लपवत आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून चीनची जोरदार आर्थिक कोंडी, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले निर्बंध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींशी संपर्कच झालेला नसताना ट्रम्प म्हणाले ‘मोदींचा मुड ठिक नाही’?
भारत-चीन सीमावाद प्रश्नावर अमेरिका मध्यस्थी करु इच्छित आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही बातचीत झाली नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिल रोजी शेवटचा संपर्क झाला होता, असे दिल्लीतील सुत्रांनी माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी लष्कराला अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून थेट युद्धांच्या तयारीचे आदेश
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाची तयारी करावी, सैनिकांचे प्रशिक्षण वाढवावे. कुठल्याही परिस्थितीचा त्वरीत आणि प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवावी असे आदेश सैन्याला दिले आहेत. तसेच देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे रक्षण करावे, अशा सूचना सैन्याला दिल्या आहेत. सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या बैठकीत बोलतांना त्यानी या सूचना केल्या.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊननंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉक़ाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अनेक देशांनी हा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाऊन हटवणाऱ्या निर्णय घेतलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर देशांनी लॉकडाऊन उठवण्यात घाई केली तर कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जागतिक तणाव निर्माण झालेला असताना महाशक्ती बनण्यासाठी मोठमोठे देश शस्त्रांस्त्रांचे भांडार उभे करण्यात व्यस्त आहेत. चीनमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच चीनने समुद्राचे २००० किमी क्षेत्रफळ बंद केले असून ७० दिवसांचा युद्धसराव सुरु केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे
जगात कोरोनानं थैमान घातले आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ३ लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता या मृतांच्या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याआधी ब्रिटन आणि चीनवर कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता आणखी एका देशानं कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचं समोर आलं आहे. हा देश आहे इटली.
5 वर्षांपूर्वी -
भारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला
मागील काही दिवासांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवादी नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत कोरोनाचे सहा हजार ६५४ नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरीच्या चुकीने डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स उघड
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींची एक चूक झाली आणि सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स समजले. करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या वातावरणात आता ट्रम्प यांच्या नावाची चर्चा पुन्हा होते आहे.
5 वर्षांपूर्वी