महत्वाच्या बातम्या
-
स्पेनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; एका दिवसात ३९४ नागरिकांचा मृत्यू
चीननंतर इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. जवळपास ६० हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक जणांचा मृत्यू घरी अथवा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे. रुग्णालयात झालेल्या मृतदेहांवर रुग्णालय प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा 'त्या' डेटा'नुसार इंग्लंडमध्ये ५ लाख तर अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी होतील - संशोधन
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे युरोपमधील देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एका संशोधनातील निष्कर्षांवरून इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे या दोन्ही देशाचे सर्वाधिक किती नुकसान होऊ शकते, याचा एक अंदाज या संशोधनात वर्तविण्यात आला आहे. या संशोधनानुसार, जर कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण अमेरिकेत झाले तर तिथे २२ लाख लोक मृत्युमुखी पडतील. तेच जर इंग्लंडमध्ये झाले तर तिथे पाच लाख लोकांचा यामुळे बळी जाईल.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन
चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनवर मात करण्यासाठी संबंधित लसीची चाचणी सुरु
चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा म्हणणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूला कोरोनाची लागण
कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. १०० पेक्षा जास्त देशात या व्हायरसने आपले हातपाय पसरलेत, 5 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आणि १ लाखाहून अधिक लोकांना विळखा घातला. या परिस्थितीतही काही जण विचित्र अशा प्रतिक्रिया देत आहेत. अशीच प्रतिक्रिया देणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूलाच कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना चिंता: अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
जगभरात कोरोनाने कहर केला आहे. या व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेसह जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि वाढता संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या व्हायरससोबत लढण्यासाठी ट्रम्प यांनी 5 हजार कोटींची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाचा सामना करण्यासाठी स्पेनमध्येही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस 'जागतिक साथीचा रोग' असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरसला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २९१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पॅन्डेमिक अर्थात ‘जागतिक साथीचा रोग’ म्हणून कोरोना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कामाचा तणावामुळे मी व्हाइट हाऊसमध्ये मोनिका'सोबत शरीर संबंध ठेवलेले: माजी राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पहिल्यांदा मोनिका लेविंस्कीसोबतच्या संबंधावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत क्लिंटन यांनी मोनिकासोबतचे संबंध मान्य केले आहे. मोनिका लेविंस्की प्रकरणामुळे क्लिंटन यांच्या कौटुंबिक आयुष्यात आणि अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
5 वर्षांपूर्वी -
उ. कोरियात एकाला कोरोनाची लागण; किम जोंग यांचे रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश
चीनमधील हुबेई प्रातांतून सुरू झालेल्या करोना व्हायरस संसर्ग हळूहळू आता जगभरात पसरू लागला आहे. जगातील जवळपास ६० देशांमध्ये करोना व्हायरस पसरला आहे. करोनामुळे तीन हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने करोना हा जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जर्मनीत बारमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू
जर्मनीच्या दोन बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनीच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहराच्या शिशा बारमध्ये गोळीबार केला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी भारतासोबत व्यापार करार अशक्य: ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले. कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळावा तसेच अन्य उत्पादनांवरील टॅक्स कमी व्हावा यासंबंधी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात करार व्हावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही यामध्ये यश मिळालेले नाही.
5 वर्षांपूर्वी -
व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही: डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- चीन'मध्ये कोरोना बाधित किंवा संशयित नागरिकांना असं ताब्यात घेतलं जातं आहे
चीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये याचा वेगाने प्रसार होतं असून चीन’मधील सरकारने बाधित किंवा संशयित नागरिकांना अक्षरशः रस्त्यावरून आणि घरातून खुचून घेऊन जाण्याचे प्रकार सुरु केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
त्याने जगाला 'कोरोना'बाबत सावध केलं; त्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी
चीनमध्ये ‘कोरोना’ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कलम ३७०: काश्मीरचा विशेष दर्जा काढून मोदींनी घातक चूक केली - इम्रान खान
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधिमंडळात इम्रान खान बोलत होते. मोदी यांनी निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा वापर बळीच्या बकऱ्यासारखा केला. त्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करावा लागला, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
करोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल
भारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणू'मुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण; भारतातही धोक्याची घंटा
भारत देशासोबत जगातल्या देशांवर एका धोकादायक वायरसचे सावट आहे. हे धोकादायक वायरस चीनमध्ये आढळले आहे. कोरोना वायरस असे या वायरसचे नाव आहे. चीनमध्ये एकूण ५९ लोकांना या धोकादायक वायरसची लागण झाली आहे. आता हा वायरस संपूर्ण जगात पसरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार थायलँडमध्ये कोरोना वायरसने एकाचा बळी घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पर्यावरणामुळे ऑस्ट्रेलियात #स्टॉप_अदाणी हॅशटॅग ट्विटरवर पेटला; ग्रेटाचा पुढाकार
ऑस्ट्रेलियात मागील आठवड्यात पेटलेल्या वणव्यानं संपूर्ण जगाच्या डोळ्यांत पाणी आलं. लाखो प्राण्यांना सूक्ष्म जीवांना, कीटकांना या आगीत आपला जीव गमवावा लागलाय. या आगीवरून आता भारतातील उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आलेत. आगीनंतर अदानी उद्योग समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्याची मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे, ही मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं केल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलयं.
5 वर्षांपूर्वी -
इराकच्या लष्करी तळावर पुन्हा रॉकेट हल्ला
इराण-अमेरिकेतील वादामुळे मध्य पूर्व आशियात तणाव निर्माण झालेला असताना इराकमधील लष्कराच्या तळावर पुन्हा एकदा रॉकेट झाला आहे. ताजी लष्कारी तळावर रॉकेट डागण्यात आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही.
5 वर्षांपूर्वी